राशीभविष्य : कोणत्या राशीच्या व्यक्तींना होणार आर्थिक लाभ जाणून घ्या

राशीभविष्य : कोणत्या राशीच्या व्यक्तींना होणार आर्थिक लाभ जाणून घ्या

सिंह आणि तुळ राशीसाठी कसा असेल आजचा दिवस? कोणती आव्हानं असणार आहेत

  • Share this:

मुंबई, 28 नोव्हेंबर : येणारा प्रत्येक दिवस सारखा नसतो. त्या दिवसात अनेक चढउतार येत असतात दिवस सुरू होण्याआधीच येणाऱ्या संकटांची चाहूल लागली तर त्यावर मात करणं थोडं सोपं होतं. त्यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.

मेष- निम्म्या वेळात आज आपली कामं संपतील. आर्थिक आणि नोकरी अशा दोन्ही आघाडीवर आपल्याला आज फायदा होणार आहे.

वृषभ- प्रेमाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस खूप खास आहे. आपला छंद आणि संगीत या गोष्टींवर जास्त लक्ष द्या. हातातून पैसा जाईल बचत होणार नाही.

मिथुन- नकारात्मक भावनांना थारा देऊ नका. आर्थिक गुंतवणूक करा त्यामधून आपल्याला फायदा मिळेल.

कर्क- गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रगतीमध्ये आज थोडा मानसिक ताण येऊ शकतो. आज आपल्याला आरामाची आवश्यकता आहे.

हे वाचा-कोरोना लस घेतल्यानंतर...; लशीच्या SIDE EFFECT बाबतही तज्ज्ञांनी केलं सावध

सिंह- व्यवसाय वाढवण्याची आज आपल्याला उत्तम संधी मिळेल. दिवसभर स्वत:ला सक्रिय ठेवा.

कन्या- आपल्या बेफिकिरी वागण्यामुळे मोठ्या संकटात सापडू शकता. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा.

तुळ- खाण्या-पिण्याच्या सवयींकडे आज विशेष लक्ष द्या. गुंतवणुकीवर आज विशेष भर द्या. आज आपल्याला आनंदाची बातमी मिळू शकते.

वृश्चिक- आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. प्रिय व्यक्तींसोबत आज आपले वादविवाद होऊ शकतात.

धनु- आज आपल्याला खूप थकवा आणि ताण जाणवेल. आजचा दिवस आपल्याला आनंद देऊन जाणारा आहे.

मकर - मित्रांसोबत आजची संध्याकाळ सुंदर जाईल मात्र खाण्या-पिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत कराल.

कुंभ- दीर्घ प्रवास आज थकवा देणारे असले तरी तुमची ऊर्जा वाढेल. आज फायदा होणार आहे. प्रिय व्यक्तीसोबत आज आपले वाद होतील.

मीन-आज आपला आत्मविश्वास वाढेल. प्रवास महाग पण फायद्याचा असेल.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 28, 2020, 7:40 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading