राशीभविष्य : कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी घ्या आरोग्याची काळजी

राशीभविष्य : कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी घ्या आरोग्याची काळजी

कोणत्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ आहे वाचा सविस्तर 12 राशींचं राशीभविष्य.

  • Share this:

मुंबई, 25 डिसेंबर : प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं जातं. आज ख्रिसमसच्या निमित्तानं कसा असेल आपला दिवस जाणून घ्या.

मेष- कामाचा ताण खूप जास्त असेल. आर्थिक संकटातून आज आपण बाहेर पडाल. आपल्याकडे समजूदारपणा असल्यानं त्याचा आज फायदा होईल.

वृषभ- गुंतवणूक करणं फायद्याचं ठरेल. आज आपल्या क्षमता विकसित करण्याकडे लक्ष द्या. प्रेमामुळे आज आपलं आयुष्य खूप सुंदर होईल.

मिथुन- आपल्याकडे इच्छाशक्तीचा अभाव आहे. वेळ सर्वकाही ठिक करेल. कामाच्या ठिकाणी आज आपला दिवस खूप कठीण असू शकतो.

कर्क- कामाचा जास्त ताण घेऊ नका. भागीदारीपासून दूर राहा घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका.

सिंह- तेलकट आणि बाहेरचे पदार्थ खाणं टाळा त्यामुळे आपलं आरोग्याला धोका पोहोचू शकतो.

कन्या- आरोग्याच्या समस्येमुळे समस्या उद्भवू शकतात. खर्च करताना स्वत: चा खर्च टाळा. कामाच्या ठिकाणी आज आपलं म्हणणं ऐकलं जाईल.

हे वाचा-...तर मास्कही तुमचं कोरोनापासून संरक्षण करू शकणार नाही?

तुळ- आज आपल्या अपेक्षा उंचावतील. आज आपल्या हातात पैसा राहणार नाही.

वृश्चिक- आज घेतलेल्या निर्णयानं तुम्ही अडचणीत येणार नाही याची काळजी घ्या. प्रेमातून आज आपल्याला आनंद मिळेल. आज आपल्या डोळ्यांवर ताण येऊ शकतो.

धनु- आज आपल्या दिवसाची सुरुवात व्यायामासह करा. आपल्या प्रगतीसाठी नवीन योजना तयार करा.

मकर - आज तणाव आणि अडचणी येणार नाहीत याची काळजी घ्या. आज गुंतवणुकीच्या संधीवर विचार करणं गरजेचं आहे. प्रेमाच्या बाबतीत आज आपली चूक होऊ शकते.

कुंभ- घरातील वातावरण चांगले नाही. आज आपल्यावर दबाव निर्माण होऊ शकतो. आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे.

मीन- आपल्या सकारात्मक वृत्तीचा परिणाम आजूबाजूच्या वातावरणावर होईल. आजचा आपला दिवस आनंदात जाईल.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 25, 2020, 7:20 AM IST

ताज्या बातम्या