राशीभविष्य : कर्क आणि सिंह राशीच्या लोकांनी आज निर्णय घेण्याआधी विचार करा

राशीभविष्य : कर्क आणि सिंह राशीच्या लोकांनी आज निर्णय घेण्याआधी विचार करा

12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

  • Share this:

मुंबई, 23 मार्च : प्रत्येक दिवस आपल्यासाठी सारखा नसतो. आपल्या ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो. आपला दिवस कसा जाणार याची कल्पना आपल्याला असेल तर काही खबरदारी घेऊन येणाऱ्या समस्या टाळता येतात किंवा त्यावर तोडगा काढता येतो. जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.

मेष - नवीन व्यवसाय, योजनांचा शुभारंभ कराल. कठोर परिश्रमानं आपण यशापर्यंत पोहोचाल.

वृषभ- नातेवाईकांसोबत वेळ घालवल्यानं आनंद मिळेल. ताण कमी होईल. लगाम वागण्यामुळे कुटुंबातील सदस्य अस्वस्थ होऊ शकतात. आपल्या कामात व्यत्यय येण्याची शक्यता आहे.

मिथुन - कामाचा ताण वाढल्यानं आपल्याला मानसिक त्रासाला सामोरं जावं लागेल. विनाकारण पैसे खर्च करू नका. आपल्या कृतीमागे लोभ नसावा तर प्रेमाची भावना असावी. नोकरीच्या नव्या संधी मिळतील.

कर्क - घाईने घेतलेला कोणताही निर्णय तुम्हाला अडचणीत आणू शकतो. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी शांतपणे विचार करा. उत्पन्नाचे नवे स्त्रोत सापडतील.

सिंह - कुटुंबातील सदस्यांच्या वागण्यामुळे आपल्याला ताण येऊ शकतो. कोणताही निर्णय घेण्याआधी परिणामांचा विचार करा. समस्यांचा सामना करावा लागेल.

हे वाचा-'कोरोना'पासून बचाव करणाऱ्यांचे टाळी वाजवून आभार, आता तुम्हाला होणार त्याचा फायदा

कन्या - आरोग्याच्या समस्या उद्भवतील. आजचा दिवस कोणतीही गोष्ट करताना सावधगिरी बाळगा. रागामुळे आपलं मोठं नुकसान होऊ शकतं. नियोजन केल्यास आजचा आपला दिवस चांगला जाईल.

तुळ - नवीन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक कराल. अपेक्षेनुसार आपल्या स्वप्नांच्या दिशेनं वाटचाल करता येईल. जोडीदार आपल्याप्रती प्रेमाची भावना व्यक्त करेल.

वृश्चिक - सवयी सोडणे चांगले आहे, अन्यथा ते केवळ आपल्या अडचणी वाढवते. संशयास्पद आर्थिक व्यवहारात अडकण्यापासून सावध रहा.

धनु - जुन्या गुंतवणूकीमुळे उत्पन्नात वाढ आहे. आपल्याला आवश्यक वेळी मित्रांचे सहकार्य मिळेल.

मकर - बर्‍याच काळापासून जाणवत असलेल्या थकवा आणि तणावातून आराम मिळेल. या समस्यांपासून कायमचा मुक्त होण्यासाठी जीवनशैलीत बदल करण्याची योग्य वेळ. आर्थिक सुधारण निश्चित आहे.

कुंभ - आपण भावनिकदृष्ट्या खूप संवेदनशील आहात, म्हणून आपल्याला ज्या गोष्टी दु:ख पोहोचवू शकतात असे प्रसंग टाळा. गुंतवणूक करण्याचा दिवस चांगला आहे.

मीन- खर्चावर नियंत्रण ठेवा हात सोडून खर्च करण्यास टाळा. आपल्या बेफिकीर वृत्तीमुळे घरात तुम्हाला टीकेचा सामना करावा लागेल.

हे वाचा-Coronavirus पासून वाचण्यासाठी घरात असं करा सॅनिटाइझ

First published: March 23, 2020, 8:56 AM IST

ताज्या बातम्या