Home /News /lifestyle /

राशीभविष्य : मेष आणि मकर राशीच्या लोकांना आज प्रेमात मिळेल मोठी निराशा

राशीभविष्य : मेष आणि मकर राशीच्या लोकांना आज प्रेमात मिळेल मोठी निराशा

कसा असेल आपला आजचा दिवस जाणून घ्या 23 एप्रिलचं राशीभविष्य.

    मुंबई, 23 एप्रिल : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो. त्यामुळे येणारी संकटं कोणती आहे याची पूर्ण कल्पना असेल तर त्याचा सामना करणं सजह शक्य होतं. त्यासाठी जाणून घ्या 23 एप्रिलचं राशीभविष्य. मेष- बेजबाबदार वृत्तीने आपण आपल्या कुटुंबाच्या भावना दुखावू शकता. बोलण्याआधी विचार करा. प्रेमात निराशा आली तरी हार मानू नका अखेर विजय खऱ्या प्रेमाचा होईल. पार्टनरसोबत वेळ घालवा. वृषभ- तणावाचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. आर्थिक गुंतवणूक किंवा योजनांमध्ये अडकणं टाळा. पार्टनरसोबत वाद होऊ शकतात. मिथुन - आरोग्याच्या समस्या उद्भवतील. सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. घाई-गडबडीत निर्णय घेऊन गुंतवणूक करू नका. भावनांवर नियंत्रण ठेवा. कर्क- तणाव टाळण्यासाठी संगीत ऐका. आपल्याकडे पैसा आला तरी खर्च होईल. खर्चावर नियंत्रण ठेवलं नाही तर भविष्यात समस्या उद्भवतील. सिंह - जोडीदारासोबत वाद बाजूला ठेवून छान वेळ घालवा. कामाच्या ठिकाणी अडथळे उद्भवतील. धीरानं आणि धीटाने त्यांचा सामना करा. हे वाचा-कोरोनापासून वाचण्यासाठी लॉकडाऊन; घरात बसल्या बसल्या या आजाराने घातला विळखा कन्या- अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. सर्जनशीलतेचा योग्य आणि चांगला वापर करा. एकतर्फी प्रेमातून आपला आनंद दुरावला जाऊ शकतो. तुळ - गुंतवणुकीतून उत्पादन वाढेल. कर्मचारी आणि व्यवसायिकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. वृश्चिक - खाण्यापिण्याची काळजी घ्या. आर्थिक बाबतीत काळजी घेणं आवश्यक आहे. आपल्या इच्छेप्रमाणे सगळं आज घडणार नाही त्यामुळे निराश होऊ नका. धनु - बँकेचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आपली माहिती विनाकारण कुणाला देऊ नका. प्रत्येक निर्णयात जोडीदाराला सोबत घ्या. मकर - आशावादी होण्यासाठी प्रवृत्त करा. एकटेपणाची भावना सतावत राहिल. आज प्रिय व्यक्ती आपल्यापासून दूर जाऊ शकते. व्यवसाय आणि व्यवहारात सावधगिरी बाळगा. कुंभ - आज केलेल्या गुंतवणूकीमुळे तुमची भरभराट होईल आणि आर्थिक सुरक्षा वाढेल. रखडलेली कामं आज पूर्ण होतील. एकमेकांना साथ देऊन प्रेम व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. मीन- नुसती दिवा स्वप्न पाहण्यात वेळ वाया घालवू नका. आपल्याविरोधात मोठं षड्यंत्र रचलं जाऊ शकतं त्यामुळे चौकस राहण्याची गरज आहे. पार्टनरची साथ नाही असं काही क्षण आपल्याला वाटू शकतं. पण संवाद साधल्यानं कदाचित मार्ग निघेल. हे वाचा-Lokdown बॉलिवूडच्या फोटोग्राफर्ससाठी एकता कपूरचा पुढाकार, दिली आर्थिक मदत
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Astrology and horoscope, राशीभविष्य

    पुढील बातम्या