राशीभविष्य : मकर आणि कर्क राशीच्या व्यक्तींनी आर्थिक व्यवहार करताना सावधान

राशीभविष्य : मकर आणि कर्क राशीच्या व्यक्तींनी आर्थिक व्यवहार करताना सावधान

प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील बदलत्या स्थितीचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो

  • Share this:

मुंबई, 21 जून : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील बदलत्या स्थितीचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो. त्यासोबत आज सूर्यग्रहणही असणार आहे. या सूर्यग्रहणाचा प्रभावही आपल्या राशीवर आणि दिवसावर असणार आहे. जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.

मेष- वरिष्ठ लोक आपल्याशी कठोरपणे वागतील. चांगल्या कामासाठी स्वत:ला प्रोत्साहित करा.

वृषभ-आत्मविश्वास वाढेल. आपलं कार्य नियोजितपणे करत राहाणं महत्त्वाचं आहे.

मिथुन- मन मोकळं होईल. जोडीदाराच्या कामात हस्तक्षेप केल्यानं त्रास होईल. बेजबाबदारपणे वागू नका.

कर्क-आज आपल्याला विश्रांतीची गरज आहे. खर्चावर वेळीच नियंत्रण ठेवा. प्रेमासाठी आज खूप चांगला योग आहे.

सिंह-आजचा दिवस चांगला असला तरी तणाव जाणवेल. जोडीदारासोबत मन मोकळं करा. आर्थिक अडचणी दूर होतील.

कन्या- आपल्या जवळचे लोक आपला विश्वासघात करतील. जोडीदाराला आनंदाची बातमी मिळेल.

तुळ- आज आराम मिळेल. गुंतवणूक करणं टाळा. आपल्या प्रियकरासह पुरेसा वेळ घालवण्याची शक्यता आहे.

वृश्चिक- आज मोठे व्यवहार होण्याची शक्यता. सकारात्मक विचार करा. वैवाहिक जीवनासाठी आजचा दिवस चांगला आहे.

धनु-आज तुम्हाला बर्‍याच समस्या आणि मतभेदांना सामोरे जावे लागेल ज्यामुळे त्रास होऊ शकतो.

मकर -आर्थिक व्यवहार करीत आहात याबद्दल सावधगिरी बाळगा.

कुंभ-योग्य सल्ल्यानेच गुंतवणूक करा. घरगुती आघाडीवर, समस्या उद्भवू शकते.

मीन-आपले सहकारी आपल्याला इतर दिवसांपेक्षा अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करतील. महत्त्वपूर्ण लोकांशी संवाद साधताना आपले शब्द काळजीपूर्वक वापरा.

हे वाचा-सूर्यग्रहणाचा चांगला की वाईट कसा होणार 12 राशींवर परिणाम, जाणून घ्या

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 21, 2020, 8:46 AM IST

ताज्या बातम्या