तुमच्यासाठी कसा असेल शुक्रवारचा दिवस, 24 जानेवारीचं राशीभविष्य

तुमच्यासाठी कसा असेल शुक्रवारचा दिवस, 24 जानेवारीचं राशीभविष्य

प्रत्येक दिवस सारखा नसतो. कधीकधी आपल्यासाठी काही चांगल्या बातम्या घेऊन येतो तर कधी आपल्यासमोर आव्हानं.

  • Share this:

मुंबई, 24 जानेवारी: प्रत्येक दिवस सारखा नसतो. कधीकधी आपल्यासाठी काही चांगल्या बातम्या घेऊन येतो तर कधी आपल्यासमोर आव्हानं. आपल्या राशीतील ग्रहांच्या स्थितीचा परिणाम प्रत्येक दिवसावर होत असतो. आपला दिवस कसा असेल, जर हे माहित असेल तर आपण काही सावधगिरी बाळगून आपला दिवस चांगला बनवू शकतो. चला जाणून घेऊया 24 जानेवारीचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल?

मेष- कोणत्याही परिस्थितीत निराश होऊ नका. जुन्या वस्तू अथवा गोष्टींमध्ये केलेली गुंतवणूक लाभदायी ठरेल. जोडीदारासोबत वेळ घालवाल. अडथळ्यांचा सामना करावा लागला तरी यश प्राप्त होईल. मित्र-मैत्रिणींना अधिक वेळ द्याल. सहकार्यांची काळजी कराल.

वृषभ - आरोग्याच्या समस्य उद्भवू शकतात. नियमित व्यायाम करणं हिताचं ठरेल. प्रत्येक गोष्टीत सावधगिरी बाळगणं हिताचं ठरेल. कौटुंबीक वाद होतील. केलेल्या नियोजनात सुधारणा करणं हिताचं ठरेल. प्रवास होईल. कामाचा आळस करणं धोक्याचं ठरेल.

मिथुन- आरोग्य चांगलं राहिल, प्रेम प्रकरणांमध्ये प्रगती होईल. खर्चावर वेळीच नियंत्रण ठेवा. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील, ज्यामुळे तुम्हाला मानसिक ताण येऊ शकेल. भविष्यातील योजनांचा पुर्नविचार करा.

कर्क- सकारात्मक विचारांमुळे तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. खर्च वाढतील. सावधगिरी बाळगणं हिताचं ठरेल. कला, व्यवसाय आणि नोकरदारांना नवीन संधी मिळतील. जोडीदारासोबत साधलेला संवाद हिताचा ठरेल. शब्द वापरताना जपून वापरा. त्यामुळे कोणीही दुखावणार नाही याची काळजी घ्या.

सिंह- आशावादी व्हा. नव्या संधी प्राप्त होतील. आर्थिक समस्यांवर योग्य विचार करून निर्णय घ्याल. मुलांसाठी योजना आखाल. व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आपला वेळ आणि शक्ती इतरांना मदत करण्यात घालवा. अर्ज करा, परंतु अशा गोष्टींमध्ये अडकणे टाळा ज्याचे आपल्याकडे काहीच करावे लागले नाही आपल्या मुलाचे किंवा वृद्ध व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित समस्या अप्रत्यक्षपणे आपल्या वैवाहिक जीवनावर परिणाम करू शकतात.

कन्या- कामाचा ताण जाणवेल. विश्रांती घेणं हिताचं ठरेल. प्रेम प्रकरणांमध्ये त्वरित पुढचं पाऊल उचलणं धोकादायक असल्यानं जरा सबुरीनं घ्या. नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी अति उत्साह महागात पडू शकतो.

तूळ- घाईत गुंतवणूक करणं टाळा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल. प्रिय व्यक्तीला वेळ न दिल्यास वाद होतील. नोकरी, व्यवसायात तुमची स्तुती होईल. ज्ञानात भर पडेल.

वृश्चिक - खाण्याकडे लक्ष द्या. जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करणं धोक्याचं ठरेल. प्रेम जीवनात आशेचा नवा किरण येईल. कामात मानसिक ताण असेल मात्र हळूहळू प्रगतीचा मार्ग सुकर होईल. चांगल्या गोष्टींसाठी अधिक वेळ द्या.

धनु- धार्मिक स्थळांना भेट द्याल. आपल्या बोलण्यामुळे किंवा कामामुळे दुखावण्याचा प्रयत्न करू नका आणि कौटुंबिक गरजा समजून घ्या. मित्र मैत्रिणींसोबत वेळ घालवाल. नोकरदार आणि व्यवसायिकांसाठी आज संमिश्र दिवस असेल.

मकर- आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. नोकरदार आणि व्यवसायिकांनी आज महत्त्वाचे निर्णय़ घेणं फायद्याचं ठरेल. कलागुणांना वाव मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. जमीन किंवा प्रॉपर्टीच्या प्रकरणांमध्ये लाभ मिळेल. प्रलंबित कामं मार्गी लागतील.

कुंभ- द्वेष दूर करण्यासाठी स्वभावात बदल करा. द्वेषाची आग खूप शक्तिशाली आहे आणि त्याचा परिणाम मनावर तसेच शरीरावर होतो. लक्षात ठेवा की वाईट चांगल्यापेक्षा अधिक आकर्षक दिसते परंतु त्याचा वाईट परिणाम होतो.

जास्त खर्च करू नका.आज आपण मिळविलेली नवीन माहिती कामात उपयोगी ठरेल. लोक आज तुमची प्रशंसा करतील, जे नेहमीच तुम्ही ऐकण्यासाठी आतूर असता आपली जोडीदार आज आपल्यासाठी काहीतरी विशेष करणार आहे. स्वयंसेवा करणे किंवा एखाद्याला मदत करणे ही आपल्या मानसिक शांतीसाठी एक चांगले टॉनिक असू शकते.

मीन- हाती घेतलेलं काम पूर्ण करा. वेळ वाया घालवणं घातक ठरेल. भविष्यातील योजनांचा विचार करा. नोकरदार, व्यवसायिकांनी कामात विशेष लक्षं देणं हिताचं ठरेल. वैवाहिक जीवनातील आकांक्षा पूर्ण होतील.

(वर दिलेली माहिती ही AstroSage.comवर दिलेल्या माहितीच्या आधारे असून राशीभविष्यात करण्यात आलेल्या दाव्याशी News18Lokmat सहमत असेलच असं नाही.)

हेही वाचा-

First published: January 24, 2020, 7:04 AM IST

ताज्या बातम्या