राशीभविष्य : मकर आणि तुळ राशीच्या लोकांना मिळणार आज आनंदाची बातमी

राशीभविष्य : मकर आणि तुळ राशीच्या लोकांना मिळणार आज आनंदाची बातमी

कसा असेल 12 राशींसाठी आजचा दिवस जाणून घ्या 24 फेब्रुवारीचं राशीभविष्य.

  • Share this:

मुंबई, 24 फेब्रुवारी: प्रत्येक दिवस आपल्यासाठी सारखा नसतो. आपल्या ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो. आपला दिवस कसा जाणार याची कल्पना आपल्याला असेल तर काही खबरदारी घेऊन येणाऱ्या समस्या टाळता येतात किंवा त्यावर तोडगा काढता येतो. त्यासाठी जाणून घ्या आज 12 राशींसाठी कसा असेल दिवस.

मेष - निरोगी आरोग्यासाठी खाण्यावर नियंत्रण ठेवा. पैसा अधिक येईल मात्र खर्चही वाढतील. मित्रांसोबत वेळ घालवाल. झालेल्या भेटींमुळे फायदा होईल.

वृषभ- आरोग्याशी संबंधीत नवीन योजना तयार करण्यासाठी आजचा चांगला दिवस आहे. पैसे कमवण्याच्या नव्या संधी उपलब्ध होतील. अचानक होणाऱ्या प्रवासामुळे ताण येईल.

मिथुन - आजचा दिवस व्यस्त असेल. अनेक लोक आज आपला उत्साह वाढवतील. आखलेल्या योजना शेवटच्या क्षणी बदलू शकतात. वैवाहिक जीवनात सावधगिरी बाळगा.

कर्क - आर्थिक परिस्थिती सुधारली तरी खर्चात वाढ होईल. आपल्या भावना व्यक्त करा. व्यवसायात नव्या संधी प्राप्त होतील.

सिंह - आर्थिक स्थिती सुधारेल. भागीदारी व्यवसायात गुंतवणूक करू नका. कुटुंबासोबत घालवलेला वेळ आनंद देणारा असेल. अपुरी कामं पूर्ण करण्याच्या दिशेनं पावलं उचलाल.

कन्या - आरोग्य चांगलं राहिल. अनपेक्षित खर्च आल्यानं आर्थिक बोजा वाढेल. अफवांपासून दूर राहा.

तुळ - आजचा दिवस आनंद देणारा असेल. आज आपण जसे बोलाल तशी कृती घडेल. त्यामुळे विचारपूर्वक बोला. संभाषणातून दिवसात ताण उद्भवू शकतो. खर्च वाढवू नका. प्रेम प्रकरणांमध्ये निराशा मिळू शकते.

वृश्चिक -पैसे कमवण्याचा दृष्टीनं अधिक मेहनत करणं गरजेचं आहे. सामाजिक जीवनाकडे दुर्लक्ष करू नका, व्यस्त कामातूनही वेळ काढून कुटुंबासोबत वेळ घालवणं आपला ताण दूर करणारं असेल.

धनु - आज अनेक लोक आपली प्रशंसा करतील. चेष्टा कऱणं आज टाळा त्यामुळे वादाला तोंड फुटू शकतं. अनोळखी व्यक्तींपासून सावध राहा. कुठल्याही व्यक्तीला आश्वासन देण्याआधी त्याची सत्यता पडताळून पाहा.

मकर - प्रवासामुळे थकवा आणि ताण येईल. आर्थिक दृष्ट्या आजाचा दिवस फायदेशीर असेल. प्रेमाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस आपल्यासाठी फायद्याचा आहे. काही ठिकाणी निराशेचा सामना करावा लागू शकतो. पार्टनरसोबत वेळ घालवल्यास ताण दूर होईल.

कुंभ - चांगले परिणाम मिळविण्यासाठी स्वतःला प्रोत्साहित करा. दीर्घकालीन नुकसान भरपाई आणि कर्ज इत्यादी दिवसाच्या शेवटी मिळेल.

मीन - प्रवास आपल्यास थकवा आणि तणाव देईल. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतील आपल्या सामाजिक जीवनाकडे दुर्लक्ष करू नका.जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल. नव्या संधी प्राप्त होतील.

First published: February 24, 2020, 7:25 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading