Home /News /lifestyle /

'या' राशीच्या लोकांना मिळणार आज शुभ वार्ता, वाचा 2 फेब्रुवारीचं राशीभविष्य

'या' राशीच्या लोकांना मिळणार आज शुभ वार्ता, वाचा 2 फेब्रुवारीचं राशीभविष्य

कसा असेल आपला आजचा दिवस, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

    मुंबई, 02 फेब्रुवारी : प्रत्येक ग्रहाचा आपल्या राशीवर परिणाम होत असतो. ग्रहांच्या बदलत्या स्थितीमुळे कधी शुभ तर कधी अशुभ संकेत मिळत असतात. जर दिवसाच्या सुरुवातीलाच आपला दिवस कसा जाणार या अंदाज आला तर आपण येणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी किंवा ते संकट टाळण्यासाठी प्रयत्नशील राहातो. कसा आहे 02 फेब्रुवारीचा दिवस जाणून घ्या. मेष - मित्रांसोबत वेळ चांगला जाईल. आर्थिक गुंतवणूक केल्यास आज फायदा मिळेल. जोडीदारावर प्रेम कराल. आरोग्याची काळजी घ्या. सकारात्मक विचारांना प्राधान्य द्या. बोलताना कोणीही दुखावलं जाणार नाही याची काळजी घ्या. वृषभ - आरोग्याकडे लक्ष द्या. मनोरंजनाच्या साधनांवर अवास्तव खर्च टाळणं हिताचं ठरेल. जोडीदार किंवा प्रिय व्यक्तीचा मूड खराब असू शकतो. तणाव जाणवेल. अवास्तव धोका पत्करणं टाळा. प्रिय व्यक्तींसोबत आज वाद होतील. मिथुन - शारीरिक आणि मनसिक स्वास्थ आणि सुरक्षा दोन्ही महत्त्वाची आहे. त्याचं संतुलन ढासळणार नाही याची काळजी घ्या. सवय आपल्याला अस्वस्थ बनवू शकते. जोडीदाराकडून सप्राइज मिळेल. नेतृत्व गुणामुळे तुमचा यशाचा मार्ग सुकर होईल. कर्क - समस्यांवर उत्तम उपाय म्हणजे हसणं आहे. त्यामुळे कायम हसत राहा आनंदी राहा.तुम्हाला बराच काळ अडकलेला नुकसान भरपाई आणि कर्ज मिळेल.आपल्या जोडीदाराबरोबर घरातील कामे पूर्ण करण्याची व्यवस्था करा. तुमच्या क्रिएटीव्हिटीचं आज कौतुक केलं जाणार आहे. अपेक्षा पूर्ण न केल्यास त्याचा परिणामांना सामोरं जाण्याची तयारी ठेवा. सिंह - रासदायक समस्या पुन्हा उद्भवू शकतात आणि आपल्याला मानसिक ताण जाणवेल. इतरांच्या सल्ल्यानं आर्थिक गुंतवणूक केल्यास मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आज मिळणारी शुभ वार्त तुमच्या आनंद द्विगुणीत करेल. अचानक प्रवास होतील. प्रवासात आपत्तीजनक समस्या निर्माण होतील. कन्या - आज शुभ वार्ता मिळेल. कमिशन आणि रॉयलटी, प्रॉपर्टी सारख्या व्यवहारांमधून फायदा होईल. नव्या आव्हानांना सामोरं जावं लागेल. नकारात्मक विचारांमुळे प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतील. तुळ - आरोग्याची काळजी घ्या. कामासंदर्भात चांगली बातमी मिळेल. जोखिम पत्करणं सध्या टाळा. त्यामुळे तुमचं भावनिक आणि आर्थिक नुकसान होऊ शकतं. नकारात्मक विचारांमुळे समस्या उद्भवतील. प्रवास करताना काळजी घ्या. वृश्चिक - आपलं कार्य करत राहा. त्यातून यशाचा मार्ग अधिक लवकर मिळेल आणि तो प्रेरणा देणारा असेल. यश मिळविण्यासाठी आपले विचार वेळोवेळी बदला. आजच्या दिवसात गुंतवणूक करणे टाळा. आज आपलं व्यक्तिमत्त्व सुधारेल आणि आपल्या मनाची प्रगती होईल. ताण जाणवू शकतो. जोडीदारासोबत एकांतात घालवलेला वेळ तुम्हाला आनंद देणारा असेल. धनु - आपल्या नकारात्मक वृत्तीमुळे आपण प्रगती करण्यास सक्षम नाही हे समजण्याची योग्य वेळ आहे. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला आहे. जुन्या आठवणी आणि भेटीगाठी आनंद देणाऱ्या असतील. प्रवास घडतील. काम लवकर पूर्ण करण्यावर भर द्या. दिवसाची सुरुवात थोडी डळमळीत असेल मात्र नंतर दिवस अल्हाददायी असेल. मकर - आजचा दिवस लाभदायी आहे. तणाव शांत होण्यास मदत होईल.एकटेपणाची भावना निर्माण होईल. वाणीवर नियंत्रण ठेवणं मानसिक आणि आर्थिक दृष्टीनं फायदा मिळून देणारं असेल. जोडीदाराची उणीव भासेल. जोडीदारावर रागवणं आज धोक्याचं ठरेल. जेष्ठांचा सल्ला महत्त्वाच्या कामांमध्ये घ्या. कुंभ - खरेदी कराल. आर्थिक स्थिती चांगली असेल. आजचा दिवस आनंद देणारा असेल. मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. आपल्या प्रतिष्ठेला इजा पोहोचणार नाही याची काळजी घ्या. मीन - गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. शांतता आणि सहकार्य यामुळे कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल. प्रेमात पडाल. शत्रूंवर बारिक नजर ठेवा. अफवांवर विश्वास ठेवू नका. वैवाहिक जीवनात तुमचा ब्रॉड माइंडेड विचार तुमचं नातं अधिक दृढ बनवण्यात मदत करेल.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या