Home /News /lifestyle /

राशीभविष्य : धनु आणि मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आहे खास

राशीभविष्य : धनु आणि मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आहे खास

कोणाचे स्टार्स चमकणार कोणाला करावा लागणार अ़डचणींचा सामना वाचा आजचं राशीभविष्य

    मुंबई, 20 एप्रिल : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील बदलत्या ग्रहांच्या स्थितीचा परिणाम आपल्यावर होत असतो. त्यामुळे येणारी आव्हानं कोणती आहेत याची आधीच कल्पना आपल्याला असेल तर आव्हानांचा सामना करणं अधिक सोपं जातं यासाठी जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस. मेष- तणावापासून दूर राहाल. हातात पैसे टिकणार नाही. जोडीदाराचा मूड चांगला नसेल. वृषभ- म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. प्रिय व्यक्तीची आठवण येईल. कुटुंबातील दबाव हे आपल्या रागाचं कारण असू शकतं. मिथुन - गुंतवणूकीसाठी चांगला दिवस नाही. कामावर लक्ष केंद्रीत करा. कठोर परिश्रम करण्याची आपल्याला गरज आहे. जोडीदाराच्या मदतीनं अडचणींवर मात कराल. कर्क- स्वत: ला शांत ठेवा कारण आज तुम्हाला अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवा, आर्थिक योजनांमध्ये अडकण्याचे टाळा. गुंतवणूकीत अत्यंत सावधगिरी बाळगा सिंह - इतरांवर अतोनात खर्च करण्यानं आर्थिक चणचण भासेल. प्रलंबित कामं आजच मार्गी लावा. विश्रांती घेण्यासाठी आज कमी वेळ आहे. एकटेपणा जाणवेल. कन्या- भांडणातून आज आपली मनस्थिती खराब होऊ शकते. प्रेमासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागेल तुळ - आर्थिक घडी बिघडल्यानं आज आपल्याला ताण येऊ शकतो. दगदग असली तरी स्वत: ला आनंदीत ठेवण्यासाठी प्रयत्न करा. वरिष्ठांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. वृश्चिक - प्रिय व्यक्तीच्या आठवणीत दिवस जाईल. आपल्या अपेक्षेनुसार गोष्टी घडणार नाहीत म्हणून निराश होऊ नका. धनु - पोटाचे विकास असलेल्या व्यक्तींनी आज विशेष काळजी घ्यावी. मित्रांच्या मदतीनं आर्थिक अडचणी दूर होतील. जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करा. मकर - आज आपल्याकडे पैसे येण्याची शक्यता पण ते खर्च होतील बचत होणार नाही. कौटुंबिक तणावामुळे आपली एकाग्रता भंग होऊ देऊ नका. सध्याची वेळ वाईट आहे त्यामुळे कोणतीही जोखीम पत्करू नका. कुंभ - आपल्या स्वभावामुळे इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल. योग्य सल्ल्यानं गुंतवणूक करा. वाईट गोष्टी विसरून प्रेमानं वागल्यास अनेक गोष्टी आपल्या हातात राहण्याची शक्यता आहे. मीन- प्रेमाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस चांगला आहे. दीर्घ आजारापासून आराम मिळेल. संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: राशिभविष्य

    पुढील बातम्या