Home /News /lifestyle /

राशीभविष्य: वृषभ आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना प्रेमात अडचणी येऊ शकतात

राशीभविष्य: वृषभ आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना प्रेमात अडचणी येऊ शकतात

12 राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस कसा असेल कोणासाठी शुभ तर कोणासाठी अडचणीचा ठरेल जाणून घ्या.

    मुंबई, 02 डिसेंबर : प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं जातं. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस. मेष- घाईघाईनं निर्णय घेऊ नका. आज आपल्याला मेहनत करावी लागेल. वृषभ- आज आपल्या प्रेमात खूप अडचणी येऊ शकतात. आज नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. मिथुन- आजचा आपला दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल. आज आपल्या अपेक्षेनुसार गोष्टी घडणार नाहीत. आजची संध्याकाळ आनंददायी असेल. कर्क- रक्तदाबाचा त्रास असलेल्या रुग्णांनी प्रवासात विशेष काळजी घ्या. आज आपला जोडीदार थोडासा विचित्र वागेल. सिंह- आज आपल्याला विश्रांतीची आवश्यकता आहे. आज संयम बाळगणं खूप आवश्यक आहे. कन्या- आर्थिक मदतीमुळे आपल्या अडचणी दूर होतील. आजची संध्याकाळ मित्र आणि नातेवाईकांसोबत छान जाईल. तुळ- निर्णय घेण्यासाठी आज स्पष्टपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. नवीन आर्थिक कराराला अंतिम रूप द्याल. वृश्चिक- छोट्या छोट्या गोष्टींमधून स्वत:ला अडचणीत आणू शकता त्यासाठी विशेष काळजी घ्या. कोणत्याही वादात अडकणार नाही याची काळजी घ्या. हे वाचा-पहिल्यांदाच एक भारतीय BATA चा बॉस; ग्लोबल CEO बनले संदीप कटारिया धनु- आज आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करा. घाईघाईनं निर्णय घेणं अचणीचं ठरू शकतं. मकर - आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. कोणताही भावनिक निर्णय घेताना विवेकबुद्धी सोडून नका. कुंभ- आज आपल्याला हुशारीनं काम करण्याची गरज आहे. आपल्या एका चुकीच्या निर्णयामुळे आपल्याला मोठा फटका बसू शकतो. मीन- आज आपला दिवस खूप जास्त व्यस्त असेल तरीही आपलं आरोग्य चांगलं राहिल. जास्त झोपू नका त्यामुळे आळस येईल.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या