Home /News /lifestyle /

राशीभविष्य : वृषभ आणि मीन राशीच्या लोकांनी प्रेमाबाबत घ्या विशेष काळजी

राशीभविष्य : वृषभ आणि मीन राशीच्या लोकांनी प्रेमाबाबत घ्या विशेष काळजी

येणाऱ्या संकटाची चाहूल आधीच लागली तर त्या संकटावर तोडगा काढण सोपं होतं. त्यासाठी जाणून घ्यायला हवं आजचं राशीभविष्य.

    मुंबई, 02 एप्रिल : प्रत्येक दिवस सारखा नसतो आपल्या राशीतील बदलत्या ग्रहांचा परिणाम आपल्यावर होत असतो. येणाऱ्या संकटाची चाहूल आधीच लागली तर त्या संकटावर तोडगा काढण सोपं होतं. त्यासाठी जाणून घ्यायला हवं आजचं राशीभविष्य. मेष - रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. पैशांचा ओघ आपल्याकडे राहिल. अफवांवर विश्वास ठेवू नका, आपलं काम नियमित आणि प्रामाणिकपणे करत राहा. वृषभ- आज आपल्याकडे बराच वेळ आहे. त्याचा सद्उपयोग छंद जोपासण्यासाठी करा. आपल्या प्रिय व्यक्तीला वेळ द्या. जोडीदाराच्या आज पुन्हा एकदा प्रेमात पडाल. मिथुन - आर्थिक व्यवहारात अडकण्यापासून सावध राहा. आज तुम्हाला तुमच्या मित्राची खूप आठवण येईल. आपली कमजोरी जाणून त्यावर काम करण्यासाठी आजचा उत्तम दिवस आहे. आजचा दिवस आपल्यासाठी कठीण असू शकतो. जोडीदाराचा वेळ न मिळाल्यानं आज आपण दुखले जाण्याची शक्यता आहे. कर्क - प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करू शकालच असं नाही. कामावर लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न करा. वाढते खर्च समस्या निर्माण करू शकतात. रागामुळे आपलं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. हे वाचा-तब्लिगी जमातमुळे तब्बल 9000 लोकांना कोरोनाचा धोका, केंद्राने जाहीर केली आकडेवारी सिंह - जोडीदारासोबत ताण वाढेल. त्यामुळे निराशा येण्याची शक्यता आहे. कोणतीही कामे करण्यापूर्वी त्याचा परिणाम काय होईल याचा विचार करा.घराशी संबंधित गुंतवणूक फायद्याचे ठरेल. प्रेमात पुरेसा वेळ न दिल्यास रागाचा सामना करावा लागेल. कन्या - खाण्या-पिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. आर्थिक परिस्थिती सुधारेल. रागावर नियंत्रण ठेवण्याच प्रयत्न करा. आपल्या रागामुळे जवळच्या आणि प्रिय व्यक्तींना दुखावू शकता. तुळ - दिवस कंटाळवाणा असेल. प्रिय व्यक्तीस आनंदित करणे आपल्यासाठी खूप कठीण आहे. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. वृश्चिक - गडबडीत गुंतवणूक करू नका, प्रेम आणि प्रणय तुम्हाला आनंदित ठेवतील.परिस्थितीनुसार योजनांमध्ये बदल करावे लागतील. आज अनेक नवीन अनुभव मिळण्याची शक्यता आहे. धनु - समस्या टाळण्यासाठी भावनांवर नियंत्रण ठेवा. मागच्या दिवसांच्या मेहनतीचं आज फळ मिळेल. प्रिय व्यक्तीच्या आठवणीत दिवस जाईल. प्रामाणिक प्रयत्न करत राहा. फळ आपोआप मिळेल. मकर - दिवसाच्या शेवटी आपल्याला आर्थिक फायदा होईल. कामकाजात झालेल्या बदलांमुळे तुम्हाला फायदा होईल.आपल्या जोडीदाराबरोबर तुम्हाला बराच वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. कुंभ- आरोग्य सुधारण्याकडे लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागेल. बॉसची मनस्थिती खराब असल्यानं पंगा घेऊ नका. जोडीदारासोबत आज वाद होतील. मीन- आर्थिक फायदा होईल. आपल्याकडे संयमाचा अभाव आहे. प्रेमाच्या बाबतीत आज अनेक गैरसमज निर्माण होऊ शकतात. हे वाचा-'...तर अभिनय करायचा विचार केला नसता', अभिनेता सुबोध भावेची प्रतिक्रिया
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Coronavirus, Coronavirus symptoms

    पुढील बातम्या