राशीभविष्य : मीन आणि वृषभ राशीच्या व्यक्तींनी रागावर नियंत्रण ठेवायला हवं

राशीभविष्य : मीन आणि वृषभ राशीच्या व्यक्तींनी रागावर नियंत्रण ठेवायला हवं

कोणाचे स्टार्स चमकणार आणि कोणाला करावा लागणार समस्यांचा सामना जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

  • Share this:

मुंबई, 19 नोव्हेंबर : प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं जातं. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.

मेष- प्रेरणा द्या आणि भीती आणि नकारात्मक भावनांना थारा देऊ नका. प्रेमात आज आपल्याला निराशा मिळेल.

वृषभ- आज आपल्याला खूप जास्त राग येऊ शकतो. प्रवासादरम्यान आज आपलं सामान जपून ठेवा.

मिथुन- आज आपला मूड चांगला नसल्यानं विचार करण्याची क्षमता कमी होऊ शकते. घाईगडबडीत आणि दबावाखाली येऊन निर्णय घेऊ नका.

कर्क- आपल्याला मिळालेला पाठिंबा उत्साह द्वीगुणीत करेल. अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च केल्यानं आज आपल्याला त्रास होऊ शकतो.

सिंह- आज आपल्याला आर्थिक फायदा होईल. एकटेपणाची भावना संपुष्टात येईल. आज लक्ष देऊन काम करणं गरजेचं आहे.

हे वाचा-16 वर्षांनंतर ही आंतरराष्ट्रीय टीम पाकिस्तानमध्ये जाऊन क्रिकेट खेळणार

कन्या- आजारपणामुळे आपल्याला आज नैराश्य येईल भावना व्यक्त करणं आपल्याला कठीण जाईल.

तुळ- प्रवासाचा आपल्याला त्रास होऊ शकतो. आपल्या घराशी संबंधित गुंतवणूक फायद्याचे ठरेल. जोडीदारामुळे आपल्या प्रतिष्ठेला थोडासा त्रास होऊ शकेल.

वृश्चिक- आज आपल्याला राग येईल. प्रवास करताना आपल्या वस्तुंची नीट काळजी घ्या. आपण कोणाबरोबर बाहेर जात आहात याचा विचार करा.

धनु- संशयी वृत्तीमुळे आज आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. आपल्या जोडीदाराचे आरोग्य तणाव आणि चिंतेचं कारण ठरू शकते.

मकर - प्रयत्नांवर एकाग्रता बाळगणं खूप कठीण आहे. जोडीदार आपल्याला निराश करेल. आज आपण पाळीव प्राण्यासोबत वेळ घालवू शकता.

कुंभ- कुटुंबियांच्या आडमुठेपणाचा आज आपल्याला त्रास होईल. आजचा दिवस सावधानतेनं पावलं उचलण्याचा आहे. स्वत:च्या गोष्टींची काळजी घ्या.

मीन- कुटुंबियांच्या भावना समजून घ्या. रागावर नियंत्रण ठेवा

Published by: Kranti Kanetkar
First published: November 19, 2020, 7:27 AM IST

ताज्या बातम्या