Home /News /lifestyle /

राशीभविष्य : कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना पार्टनरचा मूड बदलण्यात अपयश येईल

राशीभविष्य : कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना पार्टनरचा मूड बदलण्यात अपयश येईल

कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या 17 एप्रिलचं राशीभविष्य.

    मुंबई, 17 एप्रिल : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील बदलत्या ग्रहांच्या स्थितीचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो. त्यासाठीच जाणून घ्या कसा असेल आपला आजचा दिवस. मेष- बजेटच्या बाहेर खर्च गेल्यानं आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल. आज कुटुंबाचं सहकार्य मिळेल. पुन्हा एकदा प्रेमात पडल्याची जाणीव होईल. वृषभ- पैशांची चणचण असल्यानं अनेक योजनांमध्ये अडथळे निर्माण होतील. जोडीदाराच्या वागण्यामुळे कुटुंबातील सदस्यांना त्रास होऊ शकतो. आजचा दिवस व्यावसायिकदृष्ट्या सकारात्मक दिवस असेल. मिथुन - प्रेमाच्या बाबतीत असणाऱ्या कुरबुरी आज दूर होतील. शैक्षणिक आणि व्यवसायिक लाभ मिळेल. कर्क- आज चांगले कार्य करण्यासाठी आपल्या उच्च उर्जा पातळीचा वापर करा. आपले अतिरिक्त पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवा, जे आपण भविष्यात परत मिळवू शकता. कामाच्या ठिकाणी सहकारी आपले पाय खेचतील. सिंह - आज आपल्याला विश्रांती घेण्याची आवश्यकता आहे. खर्चात वाढ होईल. प्रिय व्यक्तीसोबत संवाद साधा. कामाच्या ठिकाणी चांगलं वातावरण असेल. हे वाचा-कोरोना रुग्णांच्या पायावर डाग; Coronavirus चं लक्षण आहे? कन्या- नियमित व्यायामाद्वारे आपले वजन नियंत्रित राहिल.आजूबाजूच्या लोकांच्या वागण्यामुळे तुम्हाला राग येईल. प्रिय व्यक्तीचा मूड चांगला नसल्यानं आपलं मन शांत नसेल. तुळ - भुतकाळातील गोष्टींचा विचार केल्यानं मानसिक शांतता भंग होईल. जास्त झोप किंवा आळस हानिकारक आहे. त्यामुळे दिवसभर स्वत:ला सक्रिय ठेवा. वृश्चिक -द्वेषाची आग खूप शक्तिशाली आहे आणि त्याचा परिणाम मनावर तसेच शरीरावर होतो. गुंतवणूकीशी संबंधित महत्त्वपूर्ण निर्णय दुसर्‍या दिवसासाठी सोडले पाहिजेत. आपला स्वभाव अस्थिर होऊ देऊ नका धनु - प्रिय व्यक्तीवर आज रागवाल. कामाच्या ठिकाणी अनेक समस्या उद्भवतील. ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका आणि त्यांच्या सत्याची कसून परीक्षा घ्या. तणाव दूर करण्यासाठी संगीत ऐका. मकर - तणावाकडे दुर्लक्ष करू नका. खर्चात वाढ होईल,आपल्या प्रियकरासह पुरेसा वेळ घालवण्याची शक्यता आहे कुंभ - आपल्याला जे आवडतं ते करण्याचा आजचा आपला दिवस आहे. रिअल इस्टेटमध्ये अतिरिक्त निधी गुंतविला जाऊ शकतो. पार्टनरचे सर्व हट्ट पुरवणं कठीण जाईल. नवीन व्यवसाय किंवा योजना सुरू करण्याचा विचार करत असाल तर लवकरच निर्णय घ्या. मीन- आपला आजार बरा होण्याची आज शक्यता आहे. ओळखीतून उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील. महत्त्वाचे व्यावसायिक व्यवहार करताना इतरांच्या दबावाखाली येऊ नका. हे वाचा-'या' देशात सापडला होता सर्वात पहिला Coronavirus, महिला डॉक्टरने लावला शोध संकलन, संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Astrology and horoscope

    पुढील बातम्या