Home /News /lifestyle /

राशीभविष्य : तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींना जाणवेल आज निराशा

राशीभविष्य : तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींना जाणवेल आज निराशा

कोणाचे स्टार्स चमकणार आणि कोणाला करावा लागणार समस्यांचा सामना.

    मुंबई, 16 जुलै: प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या कोणत्या याची पूर्वकल्पना असेल तर त्यावर तोडगा काढणं अधिक सोपं जातं. यासाठी जाणून घ्या 16 जुलैचं राशीभविष्य. मेष- घाईनं निष्कर्ष काढणं धोक्याचं ठरू शकतं. आजचा दिवस खूप निराश होऊ शकतो. वृषभ- तुमचा आत्मविश्वास वाढवा. गुंतवणूक फायद्याची ठरेल. आज आपल्याला प्रेम मिळवण्यात अपयशी ठराल. मिथुन- अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षावर आज तोडगा काढणं महत्त्वाचं आहे. प्रेमाची कळकळ जाणवेल. स्वत:साठी वेळ घेणं गरजेचं आहे. कर्क- आज आपल्याला चांगली बातमी मिळू शकते. दुसऱ्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणं फायद्याचं ठरेल. सिंह- प्रेमाचा मार्ग आज आपल्यासाठी चांगला असेल. आरोग्याची काळजी घ्या. कोणताही निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. हे वाचा-बारावीचा आज निकाल, News 18 Lokmat च्या वेबसाईटवर पाहता येणार कन्या- आर्थिक संकटातून मुक्त व्हाल. जोडीदारावर प्रेम करा. आज रिकाम्यावेळेत छंद पूर्ण करण्यावर भर द्या. तुळ- खर्चावर नियंत्रण ठेवा, एकतर्फी प्रेम आपल्याला निराश करू शकते. वृश्चिक- भावनांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. धनु- आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. घाईगडबड करू नका. अनावश्यक कामं करणं टाळा. आज निराशा जाणवेल. मकर - आरोग्य चांगलं राहिल. जुन्या आठवणींना उजाळा द्याल. कुंभ- रागावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका. कामाचं योग्य फळ मिळेल. मीन- आज आपल्या संयमाची परीक्षा आहे. धीर सोडू नका.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Astrology and horoscope

    पुढील बातम्या