Home /News /lifestyle /

राशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींची आज प्रेमात होऊ शकते निराशा

राशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींची आज प्रेमात होऊ शकते निराशा

कोणाचे स्टार्स चमकणार कोणाला करावा लागणार समस्यांचा सामना जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

    मुंबई, 13 जून : प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्यांची चाहूल आधीच लागली तर सामना कऱणं सोपं असतं. त्यासाठी आपल्याला आजचा दिवस कसा असेल हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. मेष - आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आपला स्वभाव अस्थिर होणार नाही याची काळजी घ्या. मनापेक्षा बुद्धीचं ऐकल्यानं आज जास्त फायदा होईल. वृषभ- आर्थिक समस्या जाणवेल. प्रत्येक गुंतवणूक काळजीपूर्वक करा आणि अनावश्यक नुकसान टाळण्यासाठी योग्य सल्ला घ्या.प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवण्यासाठी प्रयत्न करा. मिथुन- आरोग्याच्या समस्या उद्भवतील. कुटुंब की प्रिय व्यक्ती दोन्हापैकी आज एकाची निवड करावी लागेल. कर्क- आज विश्रांती घेणं आवश्यक आहे. रिअल इस्टेट गुंतवणूक आपल्याला महत्त्वपूर्ण नफा देईल. सिंह - हट्टीपणा सोडा अन्य़था त्याचा खूप मोठा फटका आपल्याला बसू शकतो. वेळेचा सद्उपयोग करा. कामाच्या ठिकाणी आपलं कौतुक होईल. कन्या- गुंतवणूक करण्याचा दिवस चांगला आहे. जोडीदाराच्या वागण्यामुळे आपण आज निराश होऊ शकता. तुळ- क्षणिक सुखासाठी कोणताही निर्णय घेऊ नका. आपल्या जोडीदाराच्या समस्या जाणून घ्या. आता आर्थिक फायद्याचा विचार करू नका. वृश्चिक- प्रिय व्यक्ती किंवा पार्टनरकडे दुर्लक्ष केल्यानं घरात तणाव निर्माण होईल. मनापेक्षा बुद्धीचं ऐकण्याची ही योग्य वेळ आहे. धनु- म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. दिवसाचे लक्ष्य मुलांचे आणि कुटुंबाचे असेल. जोडीदारासोबत छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात. मकर- आज तुम्हाला महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतील, ज्यामुळे तुम्हाला ताणतणाव आणि चिंताग्रस्त परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. कुंभ- प्रेमात हाती केवळ निराशा येईल. कुटुंबीयांसोबत वेळ घालवाल. मीन- अडचणीत असलेल्यांना आज आपण मदत कराल. गुंतवणूक करण्यापूर्वी दोनदा विचार करा. एकटेपणा जाणवेल. हे वाचा-अॅडल्ट स्टार झालेल्या या सुपर कार रेसरने महिन्याभरात कमावले 90000 डॉलर हे वाचा-हेल्दी आणि सुरक्षित आहारासाठी लक्षात ठेवा 'या' गोष्टी संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Astrology and horoscope

    पुढील बातम्या