राशीभविष्य : तुळ आणि कुंभ राशीच्या लोकांनी आज आर्थिक गुंतवणूक टाळा

राशीभविष्य : तुळ आणि कुंभ राशीच्या लोकांनी आज आर्थिक गुंतवणूक टाळा

आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या 12 एप्रिलचं राशीभविष्य.

  • Share this:

मुंबई, 12 एप्रिल : प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील संकटांची चाहूल आधीच लागली तर त्यांचा सामना करणं अधिक सोपं जातं त्यामुळे जाणून घ्या आजचा दिवस आपल्यासाठी कसा आहे.

मेष - स्वत:ला उत्साही ठेवण्याचा प्रयत्न करा. घाईत निर्णय घेऊ नका.स्वत:च्या भावनांवर नियंत्रण ठेवा.

वृषभ- समस्यांमुळे आपली मानसिक शांतता बिघडू शकते. मनोरंजन, करमणुकीमध्ये आज आपलं मन गुंतवा. वाढत्या खर्चामुळे समस्या निर्माण होतील.

मिथुन - सहकार्यांचं सहकार्य मिळेल. आर्थिक संकटातून मुक्त होऊ शकाल. उत्साह वाढवण्यासाठी आणि करमणुकीसाठी एक उत्तम दिवस.

कर्क- आर्थिक अडचणी टाळण्यासाठी आपल्या बजेट निश्चित करा. गोपनीय माहिती उघड करू नका.जोडीदार थोडेसे विचित्र वागू शकतात. पण संयमाचे धरण तोडू देऊ नका.

सिंह - खर्च नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा आणि फक्त आवश्यक वस्तू खरेदी करा. हा दिवस संस्मरणीय बनण्याची शक्यता आहे.

हे वाचा-कोरोनाग्रस्तांसाठी आशेचा किरण, संजीवनी ठरतील 'ही' औषधं

कन्या- प्रवास तुम्हाला थकवा आणि तणाव देईल. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतील. त्वरीत समस्यांचा सामना करण्याची आपली क्षमता आपल्याला विशेष ओळख देईल.

तुळ - भागीदारी व्यवसाय आणि हुशार आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करु नका. व्यापाऱ्यांसाठी चांगला दिवस आहे. जोडीदारासह आजचा दिवस चांगला जाईल.

वृश्चिक - मुलांशी मतभेद झाल्यामुळे मानसिक दबाव येऊ शकतो. आपल्या प्रिय व्यक्तीपासून दूर राहणे आपल्यासाठी फार कठीण जाईल. प्रचंड सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला दुसर्‍या फायद्याच्या दिवसाकडे घेऊन जाईल.

धनु - दीर्घकाळ गुंतवणूक करा. कुटुंबीयांच्या गरजेनुसार स्वत: ला जुळवून घ्या. अफवांपासून दूर रहा. वेगवेगळ्या विचारांमुळे आपण आणि आपल्या जोडीदारामध्ये वाद होऊ शकतो.

मकर - क्षुल्लक गोष्टींमुळे आपले नियंत्रण गमावू नका कारण यामुळे आपल्या हितसंबंधांचे नुकसान होईल.

कुंभ - आजचा दिवस आनंदान भरलेला आहे. आर्थिक व्यवहारात अडकण्यापासून सावध रहा. प्रिय व्यक्तींच्या मूड बदलण्यात अपयश मिळेल.

मीन- दीर्घ आजारापासून सुटका होईल. अडचणीच्या वेळी आपल्याला कुटूंबाकडून मदत आणि सल्ला मिळेल. प्रेमसंबंध आज कोणत्याही अडचणीत येऊ शकतात.

हे वाचा-प्रत्येकवेळी प्रामाणिकपणा गरजेचा नाही, Lockdown मध्ये अशी जपा नाती

First published: April 12, 2020, 9:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading