Home /News /lifestyle /

राशीभविष्य : कर्क आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज घाईत निर्णय घेणं धोक्याचं

राशीभविष्य : कर्क आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज घाईत निर्णय घेणं धोक्याचं

प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील बदलत्या ग्रहांच्या स्थितीचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो.

    मुंबई, 11 जून : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील बदलत्या ग्रहांच्या स्थितीचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होत असतो. येणाऱ्या समस्यांची चाहूल आपल्याला लागली तर आपण समस्यांवर उपाय शोधू शकतो. यासाठी जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस. मेष - आळस हा आपला शत्रू आहे. त्यामुळे शरीरातील ऊर्जेची पातळी घसरेल. प्रेमासाठी आजचा दिवस खास आहे. कामाचा ताण जास्त असू शकतो. वृषभ- कामाचा वाढता ताण आपल्यासाठी त्रासदायक असेल त्यातून राग वाढेल. गुंतवणूकीसाठी चांगला दिवस नाही. अनौपचारिक भेटीगाठींचा योग आहे. मिथुन- दिवस पुढे सरकेल तसा आपल्या फायद्याचा असेल. लग्नाच्या प्रस्तावावर विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे. वरिष्ठांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. कर्क- घाईघाईने निर्णय घेऊ नका.आपले सहकारी आपल्याला इतर दिवसांपेक्षा अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करतील. आठवड्याच्या अखेरीस प्रलंबित कामं मार्गी लावा. सिंह - आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कामाचा दबाव वाढेल. कन्या- सकारात्मक विचारांच्या माध्यमातून या समस्येपासून मुक्त व्हा. नवीन गुंतवणुकीबाबत विचार करा. अस्थिर स्वभावामुळे आपल्या प्रियकराबरोबर मतभेद होतील. हे वाचा-घरच्या घरी 'या' उपायांनी घशाची खवखव होईल छुमंतर तुळ- भविष्याची चिंता करताना वर्तमान विसरू नका. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. प्रिय व्यक्तीला आपल्या मनातली गोष्ट सांगाल. वृश्चिक- आज आपण अस्वस्थ असाल त्यामुळे मनसिक शांतता बिघडू शकते. लग्नाच्या प्रस्तावासाठी वेळ योग्य आहे, कारण तुमचे प्रेम आयुष्य बदलू शकते. प्रलंबित कामं मार्गी लावा. धनु- जोडीदारासोबत वाद होतील. आवडतं काम पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. मकर- ऑफिसचा ताण घरी आणू नका. यामुळे आपल्या कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडेल. कामाच्या ठिकाणी कामाचा सामना करावा लागेल. कुंभ- घाईत घेतलेला निर्णय तुम्हाला अडचणीत आणू शकतो. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी थंडपणे विचार करा. गुंतवणूकीशी संबंधित महत्त्वपूर्ण निर्णय आज घेऊ नका. मीन- धीर धरा, कारण तुमची समजूतदारपणा व प्रयत्न तुम्हाला नक्कीच यशस्वी करतील.व्यवहारांमध्ये खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. आपल्या चांगला स्वभावाचा कुणालाही फायदा घेऊ देऊ नका. हे वाचा-लहान मुलांनाही येऊ शकतं डिप्रेशन; पालकांनो या लक्षणांकडे दुर्लक्ष नको संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Astrology and horoscope

    पुढील बातम्या