मुंबई, 11 जानेवारी : प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं जातं. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.
मेष- आज आपल्या कुटुंबामुळे आपली चिडचिड होऊ शकते. आज केलेल्या गुंतवणूकीमुळे तुमची भरभराट होईल आणि आर्थिक सुरक्षा वाढेल.
वृषभ- मानसिक सहनशक्ती वाढवणं आवश्यक आहे. अनपेक्षित खर्च आपल्यावर भार टाकतील. कामाचं श्रेय कुणाला देऊ नका.
मिथुन- आज आपल्याला राग येऊ शकतो. विचारलं नसल्यास कुणालाही सल्ले देऊ नका. स्वत:वर नियंत्रण ठेवा आणि शांत राहा.
कर्क- द्वेषाची भावना खूप वाईट आहे. ज्यामुळे आपल्याला खूप त्रास होऊ शकतो. खर्चावर वेळीच नियंत्रण ठेवा.
सिंह- आज आपण अस्वस्थ असाल. आज गुंतवणूक करणं टाळा. प्रेमातून बाहेर पडा आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा.
कन्या- गुंतवणुकीचे प्रश्न आज पडतील. प्रलंबित काम, प्रकल्प योजना आज मार्गी लागतील. आज खरेदीचा दिवस आहे. आपल्या योजनांवर पुन्हा विचार करा.
हे वाचा-फक्त एका कारणामुळे श्वेताचा होकार; आदित्य नारायणनं लव्हस्टोरीबाबत केला खुलासा
तुळ- घरातील कामं करताना सावधानी बाळगा, बेजबाबदारपणे वागणं धोकादायक ठरू शकतं.
वृश्चिक- आज आपण कोणत्याही कटकटीशिवाय आराम करू शकता. आर्थिक समस्यांचा सामना करावा लागेल. छोट्या गोष्टीवरून आपलं नियंत्रण गमवू नका.
धनु- तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. आजचा दिवस आपल्यासाठी खूप फायदेशीर नाही.
मकर - दीर्घ आजारापासून सुटका होईल. आज आपल्याला आर्थिक फायदा होईल. आज जास्त झोपणं चांगलं नाही.
कुंभ- पैसे खर्च करण्याच्या मन:स्थिती असेल. प्रेमात काळजी घ्या. आपल्या संयमाची परीक्षा पाहिली जाण्याची शक्यता आहे.
मीन- बेजबाबदारवृत्तीमुळे आपण संकटात सापडाल. बोलण्यापेक्षा कृती महत्त्वाची आहे त्यामुळे आपल्या कृतीतून गोष्टी करून दाखवा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.