मकर आणि वृषभ राशीच्या लोकांनी खर्चावर ठेवा नियंत्रण, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

मकर आणि वृषभ राशीच्या लोकांनी खर्चावर ठेवा नियंत्रण, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. कधीकधी काही दिवस आपल्यासाठी चांगली बातमी घेऊन येतो तर कधीकधी आपल्यासमोर अशी अनेक आव्हानं असतात.

  • Share this:

मुंबई, 10 फेब्रुवारी: आपल्या राशीतील बदलत्या ग्रहांच्या स्थितीचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होत असतो. आजचा आपला दिवस कसा असेल, जर हे माहित असेल तर आपण सावधगिरी बाळगून आपल्य़ाला येणाऱ्या समस्यांचं निराकरण करू शकतो. जाणून घ्या 11 फेब्रुवारीचा दिवस आपल्यासाठी कसा असेल?

मेष - गडबडीत गुंतवणूक करू नका. समस्यांवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळेल. जोडीदाराची साथ लाभेल. प्रवासादरम्यान आपल्या वस्तूंची काळजी घ्या.

वृषभ - खर्चावर वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर आर्थिक समस्या उद्भवू शकतात. समस्या उद्भवल्या तर त्यावर शक्य तेवढा लवकर तोडगा काढा अन्य़था मोठं संकट येण्याची शक्यता आहे. तणाव जाणवेल.

मिथुन - कामाच्या ठिकाणी आत्मविश्वास वाटेल. समस्यांवर तोडगा काढाल, काम करताना काळजीपूर्वक करा. कोणतीही चूक होणार नाही याची कटाक्षानं काळजी घेतली तर आजचा आपला दिवस चांगला जाईल. वेळ वाया घालवू नका.

कर्क - आरोग्याच्या समस्या जाणवतील. कोणतेही कार्य करताना किंवा निर्णय घेताना सावधगिरी बाळगा. आर्थिक परिस्थिती सुधारेल. संवाद साधताना शब्द जपून वापरा. नियोजनात शेवटच्या क्षणी बदल होऊ शकतात.

सिंह - काहीसा तणाव वाटेल. अशावेळी छंद जोपासा. जुन्या गुंतवणुकीमुळे उत्पन्नात वाढ होईल. मित्र आणि कुटुंबियांचा पाठिंबा मिेळेल. जोडीदारासोबत छोट्या कारणांवरून वाद होतील. खर्चावर नियंत्रण ठेवा.

कन्या - आरोग्याच्या समस्या उद्भवतील. आर्थिक स्थिती सुधारली असली तरीही अडथळे येण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांसोबत वेळ चांगला जाईल. कोणतेही कार्य करताना धीर सोडू नका. प्रयत्न करत राहा.

तुळ - जोडीदारासोबत वाद होतील. कोणतेही कार्य करण्याआधी परिणामांचा विचार करा. तणावग्रस्त असलेला मू़ड बदलण्याचा प्रयत्न करा. आज दीर्घ काळासाठी केलेली गुंतवणूक फायदा मिळवून देणारी असेल.

वृश्चिक - आरोग्याच्या समस्या जाणवतील. नवीन संधी मिळतील. जोडीदारासोबत घालवलेला वेळा आनंद देणारा असेल.

धनु - जोडीदाराचे म्हणणे ऐकल्यानं फायदा होईल. कोणतेही कार्य करताना हजरजबाबीपणा बाळगा. कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगा.

मकर - खर्च वाढल्यानं आर्थिक समस्यांचा सामना करावा लागेल. कामाच्या ठिकाणी शब्द वापरताना जपून वापरा. मित्रांसोबत वेळ घालवाल. प्रिय व्यक्तींसोबत मतभेद होतील

कुंभ - कौटुंबिक जबाबदाऱ्यांचं भान ठेवा. प्रेमात पडाल. महत्त्वपूर्ण योजना आज मार्गी लागतील.

मीन - करमणुकीच्या साधनांवर जास्त खर्च करू नका. जुन्या आठवणी आनंद देणाऱ्या असतील. भविष्यातील योजनांवर विचार करणं आवश्यक असल्यानं त्या दृष्टीनं पावलं उचला. आज महत्त्वाची कामं मार्गी लावा. प्रवास होईल.

First published: February 11, 2020, 7:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading