मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कर्क आणि मीन राशीच्या लोकांना करावा लागेल समस्यांचा सामना, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

कर्क आणि मीन राशीच्या लोकांना करावा लागेल समस्यांचा सामना, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

कसा असेल आपला आजचा दिवस जाणून घ्या 10 फेब्रुवारीचं राशीभविष्य.

कसा असेल आपला आजचा दिवस जाणून घ्या 10 फेब्रुवारीचं राशीभविष्य.

कसा असेल आपला आजचा दिवस जाणून घ्या 10 फेब्रुवारीचं राशीभविष्य.

  • Published by:  Akshay Shitole

मुंबई, 10 फेब्रुवारी: प्रत्येक दिवस आपल्यासाठी सारखा नसतो. याचं कारण म्हणजे आपल्या राशीतील ग्रहांच्या बदलत्या स्थानाचा परिणाम असतो. त्यामुळे ग्रहांची राशीतील स्थिती बदलली की आपल्यावर त्याचा परिणाम होतो. दिवस कसा असणार याची आपल्याला पूर्व कल्पना आली तर येणाऱ्या संकटांचा सामना करणं अधिक सोपं होतं. यासाठी जाणून घेऊया 12 राशींसाठी 10 फेब्रुवारीचा दिवस कसा आहे ते.

मेष - मित्र आणि भावंडांचं सहकार्य मिळेल. मोठी आणि महत्त्वाची कामं पूर्ण होतील. नातेवाईकांबाबत चिंता वाटेल. नियमित कामांमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. धीर सोडू नका आणि आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवा. शत्रूंपासून सावध राहा.

वृषभ - थकवा जाणवेल. कामाच्या ठिकाणी भरपूर मेहनत करावी लागेल. सकारात्मक गोष्टी घडवून आणण्यासाठी समजूदारीनं काम करणं गरजेचं आहे. आजचा दिवस कामाच्या गडबडीत जाईल.

मिथुन - मनोरंजन आणि कलांमधून आनंद मिळेल. अधिक प्रयत्न करावे लागतील. सकारात्मक विचारांनी दिवसाची सुरुवात केल्यास आजचा आपला दिवस चांगला जाईल. जुन्या भेटीगाठी होतील.

कर्क - आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. समस्या किंवा नको असलेल्या गोष्टींचा सामना करावा लागेल. दैनंदिन कामांमध्ये बदल होईल. नव्या संधी मिळतील त्याचा योग्य फायदा घेता आला पाहिजे. सहाकार्यांकडून टीकेचा सामना करावा लागेल. कोणत्याही वादात न पडता आपलं कार्य करत राहाणं हे आज हिताचं ठरेल.

सिंह - मोठी ऑफर मिळेल. आजचा योग चांगला आहे. आज केलेल्या कामांमधून आपल्याला मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. महत्त्वाकांशा पूर्ण करण्याच्या दिशेनं पावलं उचलाल. जोडीदाराचं अपार प्रेम मिळेल. नकारात्मक भावना असणाऱ्या लोकांपासून दूर राहा.

कन्या - अनुभवांचा फायदा होईल. आर्थिक व्यवहारांशी संबंधीत कामं आज पूर्ण होतील. ज्येष्ठांचा आणि हितचिंतकांचा निर्णय घेताना मोलाचा सल्ला लाभेल. अविवाहितांना विवाहाचा प्रस्ताव येईल. कामाच्या ठिकाणी नव्या जबाबदाऱ्या मिळतील.

तुळ - आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. नोकरीमध्ये पुढे जाण्यासाठी बरेच नवीन मार्ग आपल्यासमोर येणार आहेत. आज तुम्ही खूप लवकर काम कराल. दिलेल्या जबाबदाऱ्या वेळीआधी पूर्ण कराल. आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण होतील.

वृश्चिक - आत्मविश्वासानं काम केल्यास आपला दिवस चांगला जाईल. वाद-विवादाचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक समस्या जाणवतील. नाही म्हणायला तयार राहा. शिक्षण, नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून अपेक्षा वाढतील. प्रेमाच्या नात्यात सुंदर वळण येऊ शकतं. ज्याची आपण पुन्हा पुन्हा आठवण कराल. दिवसाचं योग्य नियोजन केल्यास सत्कारणी लागेल.

धनु - कठीण परिस्थितीचा सामना करताना धीर सोडू नका. पण आपल्या सकारात्मक वृत्तीनं अडथळ्यांवर मात कराल. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्याल. स्वत:ला शांत ठेवा. त्यामुळे अनेक कामं यशस्वीपणे पार पाडली जाऊ शकतात. नोकरदार, व्यवसायिकांसाठी थोडा कष्टाचा दिवस आहे.

मकर - आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. समाधानी असाल. प्रगतीच्या दिशेनं वाटचाल कराल. रिअल इस्टेट आणि कोर्टाच्या खटल्यांमध्ये आज यश मिळेल. दिवस मित्रांच्या सहवासात किंवा मित्रांच्या कामात व्यस्त जाईल. प्रियकर किंवा जोडीदाराबरोबर किंवा इतर निकटच्या नातेसंबंधांमध्ये चढ-उतार असतील.

कुंभ - आजचा दिवस आपल्यासाठी अपेक्षांनी परिपूर्ण आहे. आज आपण फारच कठीण प्रकारच्या समस्यांचे निराकरण सहजपणे कराल. आपल्या योजनांची माहिती कुणाली देऊ नका. आपल्या हेतू आणि कार्यात अडथळे निर्माण केले जाऊ शकतात. कठोर परिश्रम केल्यास शिक्षण आणि राजकारणाशी संबंधित विषयांमध्ये आपण आज खूप यशस्वी व्हाल.

मीन - आजचा दिवस आपल्यासाठी समस्या आणि समस्यांनी भरलेला आहे. नकारात्मक भावनांपासून दूर रहा. आजच्या दिवस योजना तयार करून काम करा. कोणत्याही कामात यश किंवा विलंब नसल्यास निराश होऊ नका. प्रयत्न करत राहा यश येत्या काळात नक्की मिळेल. वेळ कठीण आहे पण मिळणारं फळंही तितकंच गोड आहे. त्यामुळे धीर आणि संयम सोडू नका. परिस्थिती हळूहळू आपल्याशी जुळवून घेईल. कोणतंही नवीन काम किंवा निर्णय घेण्याचं धडस आज करू नका.

First published:

Tags: Astrology and horoscope, Horoscope, राशिभविष्य