मकर आणि वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस आहे शुभ जाणून घ्या 1 जुलैचं राशीभविष्य

मकर आणि वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस आहे शुभ जाणून घ्या 1 जुलैचं राशीभविष्य

कोणाचे स्टार्स चमकणार आणि कोणाला करावा लागणार समस्यांचा सामना जाणून घ्या आजचं राशीभविष्य

  • Share this:

मुंबई, 01 जुलै : आज आषाढ शुद्ध 11. आषाढी एकादशी या शुभ प्रसंगी आजचा आपला दिवस कसा असेल कोणत्या राशींच्या व्यक्तींसाठी हा दिवस शुभ तर कुणाला समस्यांचा सामना करावा लागणार आहे जाणून घ्या 01 जुलैचं राशीभविष्य.

मेष- गुंतवणूक टाळा, तणावातून आपलं बरंच नुकसान होऊ शकतं. संयमानं आणि सबुरीनं घ्या.

वृषभ- हाताबाहेर खर्च जाणार नाहीत याची काळजी घ्या.बेजबाबदार वागणं महागात पडेल. मित्र परिवारासोबत संवाद साधा.

मिथुन- धौर्य राखून कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल. सकारात्मक वृत्तीमुळे अडथळे पार करू शकता.

कर्क- जुन्या मित्र-मैत्रीणींना भेटून आणि बोलून आनंद मिळेल. व्यवसाय किंवा नव्या संधी मिळण्यासाठी वेळ उत्तम आहे.

हे वाचा-महाराष्ट्र कोरोनामुक्त कर; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं विठुरायाला साकडं

सिंह- आज आपल्याला विश्रांती घेणं गरजेचं आहे. गुंतवणुकीतून फायदा मिळेल.

कन्या- कोणताही निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

तुळ- आरोग्य सुधारण्यासाठी पुरेसा वेळ आहे. योग्य सल्ल्यानं गुंतवणूक करा. प्रेम प्रसंगात आज जपून बोलणं आवश्यक आहे.

वृश्चिक- आजच्या दिवसात आपल्या फायद्याची काम उरकून घ्या दिवस शुभ आहे. नुकसान टाळण्यासाठी योग्य सल्ला आवश्यक आहे.

हे वाचा-आषाढी एकादशी : भक्तांऐवजी फक्त फुलांनी सजलेल्या विठूरायाचं इथे घ्या थेट दर्शन

धनु- जोडीदार आणि आपल्यात ताण निर्माण होईल. खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होईल.

मकर - आरोग्याकडे थोडं अधिक लक्ष देणं आवश्यक आहे. आजचा दिवस आपल्यासाठी आनंद देणारा आणि शुभ आहे.

कुंभ- परिस्थितीचा उज्ज्वल पैलू पहा आणि तुम्हाला दिसून येईल की गोष्टी सुधारत आहेत. गुंतवणूकीशी संबंधित महत्त्वपूर्ण निर्णय दुसर्‍या दिवसासाठी सोडले पाहिजेत.

मीन- पायर्‍या चढताना दम्याच्या रूग्णांनी काळजी घ्यावी. घाईघाईने निर्णय घेऊ नका.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: July 1, 2020, 7:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading