Home /News /lifestyle /

राशीभविष्य : वृषभ आणि कन्या राशीच्या लोकांनी आज व्यक्त करायला हवं प्रेम

राशीभविष्य : वृषभ आणि कन्या राशीच्या लोकांनी आज व्यक्त करायला हवं प्रेम

प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील बदलत्या ग्रहाच्या स्थितीचा परिणाम आपल्यावर होत असतो.

    मुंबई, 24 मे : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील बदलत्या ग्रहाच्या स्थितीचा परिणाम आपल्यावर होत असतो. दिवसातील येणारी आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना आपल्याला असेल तर त्यांचा सामना करणं अधिक सोपं जातं. त्यासाठीच जाणून घ्या कसा असेल 24 मेचा दिवस कसा असेल. मेष - अडचणींचा सामना करावा लागले. वाद-विवादाचा सामना करावा लागेल. वृषभ- प्रेमातून आज आपल्याला आनंद मिळेल. भागीदारी व्यवसायात फायदा मिळेल. मिथुन- सकारात्मक भावनांचा अवलंब करा. पार्टनरसोबत वाद होऊ शकतात. कर्क- ताणतणावाचा सामना करावा लागू शकतो. जोडीदारासोबत आजाचा दिवस चांगला जाईल. सिंह - आरोग्याकडे लक्ष द्या. वेळ घालवण्यासाठी मनोरंजनाची साधन वापरा. प्रेम प्रकरणांमध्ये घाईगडबड करू नका. कन्या- आपल्या मनातील प्रेम भावाना व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रिय व्यक्तींना निराश करू नका. तुळ- आर्थिक अडचणींमुळे महत्त्वाची कामं अडकतील. जोडीदाराच्या वागण्यामुळे तणाव निर्माण होईल. वृश्चिक- गुंतवणूक आणि भविष्यातील योजनांची माहिती गुप्त ठेवा.जोडीदारासोबत समन्वय साधताना अडचणी येतील. धनु- गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रिय व्यक्तींच्या आठवणीत वेळ चांगला जाईल. मकर- एकटेपणाची भावना खूप वाईट आहे. त्यामुळे तिचा आपल्या मनावरण परिणाम होऊ देऊ नका. कुंभ- लग्न करण्यासाठी ही वेळ योग्य आहे. प्रिय व्यक्तीचं ऐकावं लागले. प्रलंबित योजना मार्गी लागतील. मीन- बर्‍याच दिवसांनंतर आपण आपल्या जोडीदाराबरोबर वेळ घालवल्यानं आनंद मिळेल. संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Astrology and horoscope

    पुढील बातम्या