Home /News /lifestyle /

राशीभविष्य 22 जानेवारी: कुंभ आणि धनु राशीला प्रेम प्रकरणांमध्ये धोक्याची घंटा

राशीभविष्य 22 जानेवारी: कुंभ आणि धनु राशीला प्रेम प्रकरणांमध्ये धोक्याची घंटा

प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. कधीकधी काही दिवस आपल्यासाठी चांगली बातमी घेऊन येतो तर कधीकधी आपल्यासमोर अशी अनेक आव्हानं असतात.

    मुंबई, 22 जानेवारी : आजचा दिवस कोणत्या राशीसाठी शुभ आहे आणि कोणत्या राशींच्या व्यक्तींना आज धोक्याची घंटा असल्याचे संकेत मिळणार आहेत? चला तर मग जाणून घेऊयात की 22 जानेवारीचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरुपाचा असेल. नातेवाईकांबाबत चिंता वाटेल. नातेवाईकांनी केलेली मागणी पूर्ण करणं आताच्या घडीला सहज शक्य नसल्यानं तुम्हीला थोडा त्रास होऊ शकतो. नियमित कामं निभावण्यात अनेक अडचणी येतील. धीर सोडू नका, प्रयत्न करत रहा. महत्त्वाची कामं पूर्ण करण्यावर भर द्या. शत्रूंपासून सावधान. वृषभ - थकवा जाणवेल, सकारात्म विचार करा. महत्त्वपूर्ण निर्णय किंवा घरातील समस्या आजच सोडवा. मित्रपरिवार आणि आप्तेष्टांकडून सकारात्मक ऊर्जा मिळेल. समस्यांवर उत्तर मिळेल नोकरदार आणि व्यवसायिकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. मिथुन- कौटुंबीक जीवनात मतभेद होतील. तुमच्या चांगल्या स्वभावाचा गैरफायदा घेरण्याची संधी देऊ नका. आर्थिक व्यवहार करताना लक्ष द्या. तुमचा वेळ आणि ऊर्जा दुसऱ्यांना मदत करण्यासाठी द्या. भविष्यातील नियोजन आणि तरतूदी करण्यावर आतापासून भर द्या. हेही वाचा-LIVE सामन्यातच कपलचा सुरू झाला रोमान्स, आधी केलं KISS आणि... कर्क - तुम्हाला जास्त ताण जाणवत असेल तर लहान मुलांसोबत वेळ घालवा. आर्थिक चणचण जाणवेल अशावेळी हार न मानता योग्य निर्णय घ्या. कौटुंबीक जीवनामध्ये समस्यांचा सामना करावा लागेल. सिंह- गाडी चालवताना सावधानगिरी बाळगा. विवाहासाठी आजचा शुभ दिवस आहे. प्रियजनांच्या भेटीगाठी होतील. प्रवास होईल. प्रवासात समानाची आणि आपली सुरक्षितता बाळणं महत्त्वाचं ठरेल. कन्या- नकारात्मक विचार तुमच्या यशामध्ये अडथळे निर्माण करतील. खर्च वाढवलेत तर आर्थिक समस्या निर्माण होतील. त्यामुळे वेळीच खर्चावर आवार घालणं हिताचं ठरेल. मित्रांसोबत संध्याकाळचा वेळ चांगला आनंदात घालवाल. तूळ- योग आणि मेडिटेशन केल्यानं मानसिक स्वास्थ चांगलं राहिल. जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरुपाचा असेल. दिवस आनंदाचा जाईल असं वाटलं तरीही ताण असेल. जुन्या भेटीगाठी होतील. वृश्चिक - आर्थिक व्यवहारांमध्ये फसणार नाही याची विशेष काळजी घ्या. प्रेम करणाऱ्या व्यक्तींना आजचा दिवस चांगला जाईल. प्रेम प्रकरणांमध्ये पुढची दिशा ठरवाल. अफवांपासून दूर रहा. धनु- मानसिक शांतीसाठी दान-धर्म करा. भावनांवर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत वाद होण्याची संभावना. घरामध्ये धार्मिक कार्य होतील. नोकरदार, व्यवसायिकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. मकर - कामात दिरंगाई होणार नाही याकडे लक्ष द्या. कलागुणांना वाव मिळेल. निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला आवश्यक. वैवाहिक जीवनात ताण वाढणार नाही याची काळजी घ्या. कुंभ- व्यक्तीमत्त्व विकासासाठी अधिक प्रयत्नशील रहा. प्रेम प्रकरणांमध्ये गडबड करणं धोक्याचं ठरेल. नोकरदार आणि व्यवसायिकांसाठी आजचा दिवस चांगला. महत्त्वाची कामं कराल. मीन- दिवसाची सुरुवात मेहनतीनं होईल. कौटुंबीक जीवनात तणावाचं वातावरण राहिल. जोडीदार आणि मित्रपरिवारासोबत जास्त वेळ घालवाल. (वर दिलेली माहिती ही AstroSage.comवर दिलेल्या माहितीच्या आधारे असून राशीभविष्यात करण्यात आलेल्या दाव्याशी News18Lokmat सहमत असेलच असं नाही.) हेही वाचा-मुंबईत आणखी एक 'नीरव मोदी' घोटाळा, 4 हजार कोटींना लावला बँकांना चुना
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Astrology, Astrology and horoscope, Astrology today, Todays astrology

    पुढील बातम्या