Home /News /lifestyle /

राशीभविष्य : वृश्चिक आणि मकर राशीच्या व्यक्तींनी आज आरोग्याची काळजी घ्या

राशीभविष्य : वृश्चिक आणि मकर राशीच्या व्यक्तींनी आज आरोग्याची काळजी घ्या

प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा परिणाम दिवसावर होत असतो.

    मुंबई, 04 जून : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा परिणाम दिवसावर होत असतो. येणाऱ्या दिवसातील समस्यांची पूर्वकल्पना असेल तर त्यांचा सामना करण अधिक सोपं जातं. यासाठी जाणून घ्या कसा असेल 4 जूनचा दिवस. मेष - एकटेपणाची भावना चांगली नाही त्यामुळे कुटुंबासोबत वेळ घालवा. जोडीदार किंवा प्रिय व्यक्तीशी संपर्कात राहाण्यात समस्या उद्भवतील. वृषभ- पैसे गुंतवण्यासाठी आजचा दिवस चांगला नाही. नवीन प्रकल्प आणि योजना आखाला. मिथुन- नवीन योजना किंवा प्रकल्प करताना घरच्यांना विश्वासात घ्या. जोडीदारासोबत वाद होतील. कर्क- आज आपल्या खर्चात वाढ होईल. घरातील वातावरणामुळे निराश होऊ शकता. प्रियजनांसोबत सुट्टी घालवण्याचा योग सिंह - आज खर्च वाढल्यानं ताण येईल. क्षुल्लक गोष्टींवरून प्रिय व्यक्तींसोबत मतभेद होतील. सकारात्मक विचार करा. कन्या- आरोग्य चांगले राहील आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. जोडीदारामुळे थोडे नुकसान होऊ शकते. तुळ- दीर्घ काळापासून सुरू असलेल्या आजारातून सुटका होईल. आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या भावना दुखावू नयेत म्हणून रागावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीची तब्येत जपा. वृश्चिक- आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपण वादात अडकल्यास टिप्पणी देण्यास टाळा. विश्रांती घेणं फायद्याचं ठरेल. धनु- आजचा दिवस आपल्यासाठी मनोरंजनाचा असेल. प्रयत्न करत राहा नशीब आपणच साथ देईल. प्रगतीत अडथळे आले तरी धीर सोडू नका. मकर- आरोग्याची काळजी घ्या. घाईनं गुंतवणूक करू नका. आपल्या जोडीदारासाचा मूड चांगला नाही. कुंभ- खर्चात वाढ होईल. जुन्या आठवणींना उजाळा द्याल. समस्या सोडवण्यासाठी शांत डोक्यानं विचार करा. मीन- आर्थिक स्थिती सुधारेल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. कोणत्याही वादात अडकू नका. संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Astrology and horoscope

    पुढील बातम्या