मुंबई, 20 मार्च : प्रत्येक दिवस सारखा नसतो. कधी आनंद वार्ता घेऊन येतो तर कधी समस्यांचा डोंगर. येणाऱ्या समस्यांची चाहूल आधीच लागली तर त्या समस्या कशी सोडवायचा यावर विचार करता येतो. त्यामुळे दिवस कसा जाणार हे माहीत असेल तर आपल्याला पूर्वनियोजन करणं सोपं जातं. त्यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस.
मेष - आज आपल्या सहनशक्तीचा अंत पाहिला जाईल. धीर सोडू नका. भावनांवर नियंत्रण ठेवा, बेजबाबदारपणे वागू नका. घाईत निर्णय घेणं महागात पडू शकतं.
वृषभ- खाण्याकडे दुर्लक्ष करू नका. संध्याकाळचा वेळ प्रिय व्यक्तीसोबत घालवाल. परिस्थितीचा सामना करा. दूर पळाल्यानं प्रश्न सुटत नाहीत. कामाच्या ठिकाणी जबाबदारीनं वागल्यामुळे फायदा होईल.
मिथुन - आर्थिक सुधारणांमुळे आपण दीर्घकाळ प्रलंबित बिले आणि कर्ज सहजपणे परतफेड करू शकाल. प्रिय व्यक्तीसोबत आज वेळ घालवताना काळ-वेळ आणि परिस्थितीचं भान ठेवा. आपण केलेल्या परिश्रमांचं योग्य फळ मिळेल. नोकरीत समस्या उद्भवू शकते. कोणत्याही महत्त्वपूर्ण निर्णयाला अंतिम रुप द्याल.
कर्क- भावनांवर नियंत्रण ठेवा. समस्यांचा सामना करावे लागेल. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. कोणत्याही गोष्टीवरून वाद घालणं टाळा.
सिंह - नव्या संधी, मोठी ऑफर मिळण्याची शक्यता आहे. रिअल इस्टेट गुंतवणूक आपल्याला महत्त्वपूर्ण नफा होईल. वेळ वाया घालवू नका.
हे वाचा-Nirbhaya Justice LIVE : निर्भयाच्या दोषींना तिहार जेलमध्ये दिली फाशी
कन्या - प्रगतीचा वेग कायम ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करा. आज गुंतवणूक करणे टाळा. भागीदारी व्यवसायांमध्ये समस्या निर्माण होतील. तुमचा जोडीदार तुमच्याकडे विशेष लक्ष देईल.
तुळ - लांबचा प्रवास टाळा, उत्पन्नाचे स्त्रोत मिळतील. प्रेमाचा अभाव जाणवेल. कामाच्या ठिकाणी आनंद वार्ता मिळेल. प्रयत्न केला तर आजचा दिवस आपल्यासाठी चांगला जाणार आहे.
वृश्चिक - नकारात्मक विचार धोक्याचे आहेत. पैसे मिळतील. जुने व्यवहार, कर्ज आपल्याकडे येईल. शेजार्यांशी वाद घातल्यानं आपला मूड खराब होऊ शकतो. प्रिय व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी घ्या.
धनु - वृद्ध व्यक्तींनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक उत्पन्न चांगलं असेल. कामाच्या ठिकाणी त्वरित फायदा होणार नाही. प्रवासाचा दीर्घकाळासाठी फायदा होईल.
मकर - कोणताही निर्णय घेण्याआधी दोनवेळा विचार करा.नकळत आपण भावना दुखावू शकता. कोणतीही चांगली बातमी संपूर्ण कुटुंब आनंदी करेल भावनात्मक उलथापालथ आपल्याला त्रास देईल.
कुंभ - वरिष्ठांच्या दबावामुळे तुम्हाला ताणतणावाचा सामना करावा लागू शकतो. मची कामातील एकाग्रता बिघडेल. कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका.
मीन- बेजबाबदार वृत्तीमुळे टीकेचे धनी व्हाल. बोलण्यापूर्वी दोनदा विचार करा. गुंतवणूक करताना दोन वेळा विचार करा. कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.
हे वाचा-दूध पिशवी, डोअर बेल आणि पेपरमधून कोरोना पसरू शकतो? काय म्हणतात डॉक्टर...