मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

राशीभविष्य : कन्या आणि कुंभ राशीच्या लोकांना प्रेम व्यक्त करण्यासाठी चांगला दिवस

राशीभविष्य : कन्या आणि कुंभ राशीच्या लोकांना प्रेम व्यक्त करण्यासाठी चांगला दिवस

12 राशींसाठी कसा असेल आजचा आपला दिवस जाणून घ्या.

12 राशींसाठी कसा असेल आजचा आपला दिवस जाणून घ्या.

12 राशींसाठी कसा असेल आजचा आपला दिवस जाणून घ्या.

  • Published by:  Akshay Shitole

मुंबई, 12 मार्च : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो. त्यामुळे रोजच्या दिवसात येणाऱ्या समस्या काय हे आपल्याला आधीच माहीत असेल तर त्या समस्यांवर तोडगा काढणं अधिक सोप जातं. यासाठी आपल्या दिवस कसा असेल जाणून घ्या 12 मार्चचं राशीभविष्य.

मेष - अस्थिर स्वभावामुळे आपणास पराभवाला सामोरे जावे लागू शकते.प्रवास तुम्हाला थकवा आणि तणाव देईल

वृषभ- ताण आल्यामुळे मानसिक शांतता भंग होऊ शकते. नवीन करार फायद्याचे वाटू शकतात.गुंतवणूक करताना घाईघाईने निर्णय घेऊ नका.

मिथुन - आपल्या मनातील गोंधळ सोडवणं महत्त्वाचं आहे. दीर्घकालीन नफ्यासाठी गुंतवणूक करा. इतरांच्या मदतीशिवाय महत्त्वपूर्ण कामे करू शकता.

कर्क - आर्थिक लाभ अपेक्षेनुसार होणार नाही. आजचा दिवस काहीसा खराब असू शकतो. जोडीदारासोबत संवाद साधण कठीण होईल.

सिंह - आर्थिक स्थिती सुधारेल. ताण कमी होईल. भावनांवर नियंत्रण ठेवण्यात अडचण येईल. आपल्या लोकांसोबत वाद टाळा. प्रिय व्यक्तीला तुमच्याकडून विश्वास आणि वचन द्या. घाईगडबडीत निर्णय घेऊ नका.

कन्या - नशिबावर अवलंबून राहू नका. आज आपल्या कामांमध्ये सूड बुद्धीनं अनेक जण अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील. प्रेमाची कबुली द्याल. कुठल्याही गोष्टीवर पटकन विश्वास ठेवू नका त्याची सत्यता पडताळा.

हे वाचा-पुण्यातील धक्कादायक प्रकार, नोकरी गेल्यानं घरखर्च भागवण्यासाठी तरुण झाला चोर

तुळ - आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करणं आज टाळा. गुंतवणूकीत अत्यंत सावधगिरी बाळगा. आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या. आपल्या अपेक्षेनुसार काम होतील.

वृश्चिक - आपल्या उदार स्वभावामुळे आज आपला दिवस आनंदी असेल. जास्त पैसे कमवू शकता. दिवस खास करण्यासाठी संध्याकाळी आपल्या पार्टनर किंवा कुटुंबियांसोबत वेळ घालवा.

धनु - कुटुंबाच्या हिताविरोधात काम करणं टाळा. आपल्या कामातून समस्या निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या. खर्च वाढेल.

मकर - बर्‍याच काळासाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला बराच फायदा मिळू शकेल.नवीन कल्पनांनी परिपूर्ण व्हाल. कामाच्या ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त फायदा मिळेल. जोडीदारासोबत वाद होतील.

कुंभ - नशिबावर अवलंबून राहू नका, आपले प्रयत्न सुरू ठेवा. आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा. अचनक मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. आपल्या प्रिय व्यक्तीला भेटाल त्यांच्यासोबत वेळ घालवाल. नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर आजचा दिवस चांगला आहे. समस्यांमध्ये अडकून राहू नका. आपल्याला एकाच गोष्टीची निवड करावी लागेल. पार्टनरसोबत वाद होतील.

मीन- कामाचा ताण आपल्या रागाला कारण ठरेल. नवीन कल्पना आर्थिक लाभ मिळवून देतील. भावनांवर नियंत्रण ठेवा. बेजबाबदारपणाने वागणं महागात पडू शकतं. ऐकलेल्या गोष्टींवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. कौटुंबिक समस्यांचा सामना करावा लागेल.

हे वाचा-अजब लॉजिक! विराट-सेहवागमुळे टीम इंडियाचा वर्ल्ड कपमध्ये पराभव

First published:

Tags: Astrology and horoscope, Horoscope, राशीभविष्य