राशीभविष्य : कर्क, कन्या आणि धनु राशीच्या लोकांसाठी आज धोक्याची घंटा, उद्भवणार समस्या

राशीभविष्य : कर्क, कन्या आणि धनु राशीच्या लोकांसाठी आज धोक्याची घंटा, उद्भवणार समस्या

12 राशींसाठी कसा असेल आजचा आपला दिवस जाणून घ्या.

  • Share this:

मुंबई, 09 मार्च : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो. त्यामुळे आजचा दिवस आपल्यासाठी कसा आहे जाणून घ्या 09 मार्चचं राशीभविष्य.

मेष - आरोग्याची काळजी घ्या. खर्च वाढले तरी आर्थिक परिस्थिती चांगली असल्यानं समतोल साधण्यात यश मिळेल. आपल्या योजनांमध्ये आज सुधारणा करावी लागेल.

वृषभ- दीर्घ काळापासून सुरू असणारी समस्या आज सुटेल. रिअरल इस्टेटमध्ये केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल. आपलं लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेनं वेगान पावलं उचलण्याची गरज आहे.

मिथुन - इतरांना प्रभावित करण्यावर जास्त वेळ वाया घालवू नका. कुटुंबियांसोबत घालवलेला वेळ चांगला जाईल. प्रिय व्यक्तीला भावनिक आधार द्याल. यश आपल्या आवाक्यात असेल.

कर्क - भागीदारी व्यवसायात आणि चतुर आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करु नका. आपली प्रिय व्यक्ती आपल्या वागण्यावरून आपल्यावर रागवेल.

सिंह - सावधगिरी बाळगल्यास समस्या निर्माण होणार नाहीत. लक्षपूर्वक गुंतवणूक करा. कामाच्या ठिकाणी गैरवर्तन होऊ शकतं.

कन्या - भागिदारी व्यवसाय आणि आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करु नका. एकतर्फी प्रेमात आपला वेळ वाया घालवू नका. मित्रांसोबत घालवलेला वेळ चांगला जाईल.

हे वाचा-लाल, पिवळा, गुलाबी; वास्तूशास्त्रानुसार कोणत्या रंगांनी खेळाल होळी?

तुळ - समस्यांचा सामना करावा लागेल. परिस्थितीशी सामना करताना त्वरित प्रतिक्रिया देऊ नका. प्रेम प्रकरणांमध्ये जरा सांभाळून. इतरांना मदत कराल.

वृश्चिक - कामाचा ताण आपल्या रागाचे कारण बनू शकेल. जोडीदारासोबत चांगले समजून घेण्यामुळे आयुष्यात आनंद मिळेल. प्रिय व्यक्तीला आपल्या मनातील भावना सांगण्यासाठी आज उत्तम दिवस आहे.

धनु - कठोर स्वभावाचा फटका तुम्हाला सहन करावा लागू शकतो. बोलण्याआधी दोनवेळा विचार करा.     नवीन करार फायदेशीर वाटू शकतात परंतु त्यांना अपेक्षित लाभ मिळणार नाही. गुंतवणूक करताना घाईनं निर्णय घेऊ नका. प्रिय व्यक्तीचे दोष शोधण्यात वेळ घालवू नका.

मकर - दीर्घ काळासाठी गुंतवणूक केली तर आपल्याला चांगले उत्पन्न मिळेल. नवीन कल्पनांनी परिपूर्ण व्हाल. जोडीदारासोबत वाद होतील.

कुंभ - नशिबावर अवलंबून राहू नका. आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा. अचानक शोध मिळण्याची शक्यता आहे. नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर आजचा दिवस चांगला आहे. समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. आपल्याला समोर आलेल्या परिस्थितीतून दोनपैकी एकाची निवड करावी लागेल. प्रिय व्यक्तींसोबत वाद होतील.

मीन- कामाचा ताण असल्यानं राग वाढेल. नवीन कल्पना आपला आर्थिक फायदा करेल. आपल्या प्रियजनाच्या म्हणण्यावर तुम्ही खूपच प्रतिक्रिया व्यक्त कराल. आपल्या बेजबाबदार वागण्याचा मोठा फटका बसेल. कुटुंबात समस्या निर्माण होऊ शकतात. आंधळेपणाने कुणावरही विश्वास ठेवू नका.

हे वाचा-तुमची गर्लफ्रेंड खरंच तुमच्यावर प्रेम करते की फक्त तुमचा वापर करते, कसं ओळखाल?

First published: March 9, 2020, 7:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading