Home /News /lifestyle /

राशीभविष्य : मिथुन आणि मीन राशीच्या लोकांचे पार्टनरसोबत होऊ शकतात वाद

राशीभविष्य : मिथुन आणि मीन राशीच्या लोकांचे पार्टनरसोबत होऊ शकतात वाद

आजचा दिवस आपल्यासाठी कसा असेल जाणून घ्या 06 मार्चचं राशीभविष्य.

    मुंबई, 06 मार्च : प्रत्येक दिवस सारखा नसतो. कधी आनंद वार्ता घेऊन येतो तर कधी समस्यांचा डोंगर. आपला दिवस कसा जाणार आहे याची पूर्व कल्पना मिळाली तर आपण येणाऱ्या समस्यांचं निराकरण करू शकतो त्यासाठी जाणून घ्या 06 मार्चचं राशीभविष्य. मेष - गर्दीच्या ठिकाणी प्रवास करताना आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक संकटातून मुक्त होऊ शकाल. तुमच्या जोडीदाराच्या अनुभवामुळे तुम्ही पुन्हा एकदा त्यांच्या प्रेमात पडू शकता. वृषभ- येणाऱ्या समस्यांपासून निराश होऊ नका. पार्टनरसोबत रोमँटिक प्रवास कराल. कामाच्या ठिकाणी तणावाचा सामना करावा लागेल. मिथुन - आपला आनंद इतरांसोबत शेअर केला तर आरोग्य उत्तम राहिल. आर्थिक परिस्थितीमुळे काही महत्त्वाचे काम मध्यभागी अडकले जाऊ शकते. अनावश्यक गोष्टींवर जास्त खर्च कराल. वाद टाळण्यासाठी आपल्या प्रिय व्यक्तीशी आज बोलू नका. गाडी चालवताना काळजी घ्या. कर्क - उगाच सल्ला किंवा आपली मतं विनाकारण मांडायला जाऊ नका. स्वत:वर ताबा ठेवा आणि शांत राहा. गुंतवणूक करताना विचार आणि काळजीपूर्वक करा. तोटा टाळण्यासाठी योग्य सल्ला घ्या. हे वाचा-तुम्हाला कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसली तर... काय करायचं, कुठे जायचं जाणून घ्या सिंह - कोणताही संघर्ष किंवा विरोध टाळा, कारण त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होईल. घाईत निर्णय घेऊ नका. आर्थिक व्यवहाराची वाटाघाटी करताना जोखीम घेणं फायद्याचं असेल. मेहनतीचं फळ मिळेल. कन्या - खर्चात वाढ होईल. वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. आरोग्याच्या समस्या अप्रत्यक्षपणे आपल्या वैवाहिक जीवनावर परिणाम करू शकतात. तुळ - आपण परिस्थितीवर पकड मिळवण्याचा प्रयत्न करा. आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल. कौटुंबिक समस्या उद्भवल्यानं ताण येईल. वृश्चिक - बरं वाटत नसल्यास कोणतंही औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रमाणापेक्षा जास्त पैसे खर्च करणं भविष्याच्या दृष्टीनं धोक्याचं ठरेल. अनोळखी व्यक्तींबरोबरच सावधगिरी बाळगा. धनु - विनाकारण वाद घालून आपली उर्जा वाया घालवू नका. पारंपरिकरित्या गुंतवणूक केली तर आपण चांगले पैसे कमवू शकता. भेटीगाठी होतील, मित्रांसोबत वेळ चांगला जाईल. मकर - टीकेचे धनी व्हाल. अचनक मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. पार्टनर आज आपली विशेष काळजी घेईल. कामाच्या ठिकाणी पगारवाढ झाल्यानं उत्साह असेल. कुंभ - आपल्या क्षमता ओळखा. आपल्याकडे इच्छाशक्तीची कमतरता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्हाला आवडणारी व्यक्ती कायम तुमच्यावर प्रेम करत राहिल. कायदेशीर बाबींमध्ये सल्ला आवश्यक आहे. मीन- खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आज गुंतवणूक करू नका. पार्टनरसोबत मतभेद होऊ शकतात. हे वाचा-काय आहे शिल्पा शेट्टीच्या फिगरच रहस्य? रोज जेवणात असतात हे पदार्थ
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Horoscope, राशीभविष्य

    पुढील बातम्या