राशीभविष्य : वृश्चिक आणि कुंभ राशीच्या लोकांचे जोडीदारासोबत होऊ शकतात वाद

राशीभविष्य : वृश्चिक आणि कुंभ राशीच्या लोकांचे जोडीदारासोबत होऊ शकतात वाद

आजचा दिवस आपल्यासाठी कसा आहे जाणून घ्या 05 एप्रिलचं राशीभविष्य

  • Share this:

मुंबई, 05 एप्रिल : प्रत्येक दिवस सारखा नसतो. त्यामुळे आजचा दिवस आपल्यासाठी कसा आहे जाणून घ्या 05 एप्रिलचं राशीभविष्य

मेष - आर्थिक लाभ मिळेल. नकारात्मक भावनांवर नियंत्रण ठेवा. आज आपल्याला समस्यांचा सामना करावा लागेल.

वृषभ- रिअल इस्टेट गुंतवणूक आपल्याला महत्त्वपूर्ण नफा देईल. आपण आपल्या घरगुती जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका.

मिथुन - गुंतवणुकीव्यतिरिक्त महत्त्वाचे आज निर्णय घेऊ शकता. कोणीही आपल्या वागण्याचा गैरफायदा घेणार नाही याची काळजी घ्या.

कर्क - ठेवीमधून आज आपल्याला पैसे मिळतील. प्रेमात तिसऱ्या व्यक्तीचं येणं हे दोघांसाठी धोक्याची घंटा असेल. डोळ्यांचं आरोग्य जपा.

सिंह - आपल्या स्वभावामुळे मित्रांसोबत समस्या निर्माण होतील. गुंतवणूक करणं टाळा. समस्यांचा सामना करावा लागेल.

हे वाचा-चपलांमार्फत coronavirus तुमच्या घरात तर येत नाही ना?

कन्या - आज आपण विश्रांती करणं आवश्यक आहे. विनाकारण खर्च करण्याची वृत्ती वाईट आहे. खोटं वागण्यानं प्रेम संबंध बिघडतील.

तुळ - आज आपण मोठे बदल होतील असे निर्णय घ्याल.जोडीदारासोबत आजचा दिवस चांगला जाईल.

वृश्चिक - आज आपल्याला पैसे मिळतील. घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नका. आपल्या स्वभावामुळे पार्टनरसोबत वाद होतील.

धनु - तज्ज्ञांच्या सल्ल्याविना कोणतीही गुंतवणूक करू नका. आपल्या शत्रूंकडून आज अफवा पसवल्या जावू शकतात. सावध राहा सतर्क राहा.

मकर - पैशांशी संबंधित समस्या उद्भवतील. वाढते खर्च आपलं बजेट बिघडवू शकतात. निर्णय घेताना घाई करू नका.

कुंभ- दुसऱ्यांचा चुकांचा आपल्याला त्रास सहन करावा लागेल. आर्थिक अनिश्चितता जाणवेल. पार्टनरसोबत वाद नाही संवाद साधा.

मीन- धनलाभ होईल, प्रभावशाली व्यक्तीमत्त्वाकडून आपल्याला पाठिंबा मिळेल.नवीन कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

हे वाचा-नरेंद्र मोदींच्या सकाळच्या व्हिडिओ मेसेजनंतर लोकांनी Google वर शोधलं Dada Kondke

First published: April 5, 2020, 8:12 AM IST

ताज्या बातम्या