Home /News /lifestyle /

राशीभविष्य : वृषभ आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना करावा लागेल अडचणींचा सामना

राशीभविष्य : वृषभ आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना करावा लागेल अडचणींचा सामना

कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या 29 एप्रिलचं राशीभविष्य.

    मुंबई, 29 एप्रिल : प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील आव्हानं आणि समस्या कोणत्या याची पूर्वकल्पना आली तर आव्हानांचा सामना करणं सोपं जातं याचीसाठी जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस. मेष- हुशारीने काम केले तर आज तुम्ही जास्त पैसे कमवू शकता. आज प्रेम प्रकरणांमध्ये आजचा दिवस चांगला आहे. वृषभ-ध्यान आणि स्वत: ची विचारसरणी फायदेशीर सिद्ध होईल. आर्थिक व्यवहार करताना सावधिगिरी बाळगा. समस्यांवर नियंत्रण राहिल. मिथुन- गोंधळात पडू शकता. वेळेचा योग्य वापर करा. जुन्या आठवणी ताज्या होतील. संपर्कातून संवाद साधता येईल. कर्क- गुंतवणूक करण्याची संधी आहे. जोडीदाराकडून मिळालेली कोणतीही चांगली बातमी उत्साह वाढवेल. सल्ल्यासाठी वकीलाकडे जाण्याचा दिवस चांगला आहे. सिंह - प्रेम, आशा, सहानुभूती, आशावाद आणि निष्ठा यासारख्या सकारात्मक भावनांचा अवलंब करण्यासाठी स्वत:ला प्रोत्साहित करा. घाईने घेतलेला कोणताही निर्णय दबाव निर्माण करू शकतो कन्या- निर्णय घेताना इतरांच्या भावना दुखवणार नाहीत याची काळजी घ्या.मच्या कोणत्याही चुकीच्या निर्णयाचा वाईट परिणाम होऊ शकतो. आपल्या स्वार्थी वागण्यावर नियंत्रण ठेवा. तुळ- अडचणींचा सामना करावा लागेल. सावधगिरी न बाळगल्यास मोठ्या संकटांमध्ये फसाल. विचार करून बोला. प्रियजन आणि कामाच्या ठिकाणी त्याचा मोठा फटका बसेल. वृश्चिक- करमणूक आणि मनोरंजनावर जास्त वेळ घालवू नका. प्रचंड सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला दुसर्‍या फायद्याच्या दिवसाकडे घेऊन जाईल. धनु- आपल्या क्षमता ओळखणं गरजेचं आहे. करमणुकीसाठी वेळ आणि पैसा खर्च करु नका. पार्टनरसोबत वेळ घालवाल. वैवाहिक जीवनात आज कठीण काळ असू शकतो. मकर- खाण्यापिण्याची काळजी घ्या. प्रेमात निराशा मिळण्याची शक्यता आहे. आपल्याकडे परिस्थितीवर मात करण्यासाठी तीव्र इच्छाशक्ती असेल तर काहीही अशक्य नाही. कुंभ- आवडतं काम आज पूर्ण करा. आर्थिक अडचणींमुळे समस्यांचा सामना करावा लागेल. आपल्या संयमाची परीक्षा आहे. हार मानू नका. पार्टनर आज आपल्यावर रागवू शकतो. मीन- आपल्या सकारात्मक वृत्तीचा आजूबाजूच्या लोकांवर चांगला परिणाम होईल. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. प्रेमाला बहर येईल. मनाचं ऐकण्यापेक्षा बुद्धीचं ऐका. संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Astrology and horoscope

    पुढील बातम्या