Home /News /lifestyle /

राशीभविष्य : मेष आणि तुळ राशीच्या लोकांनी आज खर्चावर ठेवायला हवं नियंत्रण

राशीभविष्य : मेष आणि तुळ राशीच्या लोकांनी आज खर्चावर ठेवायला हवं नियंत्रण

त्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील बदलत्या ग्रहांच्या स्थितीचा परिणाम आपल्या दैनंदिन व्यवहारावर होत असतो.

    मुंबई, 28 मार्च : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील बदलत्या ग्रहांच्या स्थितीचा परिणाम आपल्या दैनंदिन व्यवहारावर होत असतो. त्यामुळे येणाऱ्या दिवातली आव्हानं कोणती आहेत याची पूर्व कल्पना असेल तर त्यांचा सामना करणं अधिक सोपं असतं. त्यासाठीच जाणून कसा आहे 12 राशींसाठी 28 मार्चचा दिवस. मेष - दबावामुळे मानसिक ताण येईल. खर्चाच भर पडल्यानं समस्या वाढतील. विचार करू प्रत्येक पाऊल टाका. प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागेल. वृषभ- स्वप्न वास्तवात उतरण्याचा हा तो क्षण आहे. गुंतवणूक कऱण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. मतभेद टाळा. मिथुन - दीर्घ काळ केलेल्या गुंतवणुकीतून आज आपल्याला फायदा मिळणार आहे. प्रत्येक गोष्टीत धीर धरा संयम राखण महत्त्वाचं आहे. कामाच्या ठिकाणी आपल्या संयमाचा कस लागेल. कर्क - कौटुंबिक जबाबदाऱ्यांपासून पळ काढू नका. व्यवसाय आणि व्यवहाराच्या बाबतीत भावनिक निर्णय घेऊ नका. प्रिय व्यक्तीची आठवण येईल. हे वाचा-हेच बाकी होतं! कोरोनाच्या भीतीनं पोलिसांनी दांडुके केले सॅनिटाइज, VIDEO VIRAL सिंह - प्रभावशाली लोकांच्या पाठिंब्यामुळे आपला उत्साह वाढेल. सुधारणांमुळे आपण बर्‍याच काळासाठी प्रलंबित बिले आणि कर्ज सहजपणे परतफेड करू शकाल.जरासा निष्काळजीपणा आपल्या आजाराचं कारण ठरू शकतो. कन्या -रिअल इस्टेटमध्ये अतिरिक्त निधी गुंतविला जाऊ शकतो. आपल्याला अडथळ्यांचा सामना करावा लागेल. आपला गैरफायदा घेणार नाही याची काळजी घ्यावी. सकारात्मक विचाराने आजच प्रयत्न करा तर यशाचा मार्ग सोपा होईल. तुळ - खर्च नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा आणि फक्त आवश्यक वस्तू खरेदी करा. जोडीदारासोबत वेळ घालवा. वृश्चिक - योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी दोनदा विचार करा. सहकार्यांकडून अपेक्षित सहकार्य होणार नाही; पण धीर धरा. कुटुंबात मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. हे वाचा-कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या पुण्यातल्या सिस्टरला थेट नरेंद्र मोदींचा फोन धनु - रागावर नियंत्रण ठेवा. इतरांना प्रभावित करण्यासाठी जास्त खर्च करु नका. सकारात्मक वृत्तीमुळे कुटुंबातील लोक प्रभावित होतील आणि त्याचं कौतुक करतील. आज आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतील. मकर - आपल्या बेजबाबदार वृत्तीने आपण आपल्या कुटुंबाच्या भावना दुखावू शकता. बोलण्यापूर्वी दोनदा विचार करा. कोणत्याही सल्ल्याविना गुंतवणूक करणं धोक्याचं ठरेल. कुंभ- आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुमचा आत्मविश्वास बळकट करण्यासाठी हे खूप महत्वाचे आहे. प्रिय व्यक्तींचा मूड बदलण्यात अपयश मिळेल. विश्वासाच्या आधारावर आपलं नातं टिकवाल आणि पुन्हा नव्यानं त्या नात्याच्या प्रेमात पडाल. पार्टनरच्या प्रकृतीची काळजी घ्या. मीन- बाहेर जाताना विशेष काळजी घ्या. आर्थिक परिस्थिती सुधारेल. काहीतरी नवीन आणि सर्जनशील करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. कुटुंब आणि मित्रांसोबत घालवलेला वेळ आनंद देणारा असेल. हे वाचा-लॉकडाऊनचा असाही फायदा, तरुणाने 3888 'Push Pins'ने साकारलं उद्धव ठाकरेंचं पोट्रट
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Astrology and horoscope

    पुढील बातम्या