Home /News /lifestyle /

राशीभविष्य : वृषभ आणि तुळ राशीच्या लोकांनी आज विचार करून निर्णय घ्या

राशीभविष्य : वृषभ आणि तुळ राशीच्या लोकांनी आज विचार करून निर्णय घ्या

12 राशींसाठी कसा असेल आजचा आपला दिवस जाणून घ्या.

    मुंबई, 28 फेब्रुवारी : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो. त्यामुळे आजचा दिवस आपल्यासाठी कसा आहे जाणून घ्या 28 फेब्रुवारीचं राशीभविष्य. मेष - सकारात्मक विचारांनी अडचणींवर मात कराल. जोडीदारासोबत घालवलेला वेळ चांगला जाईल. वृषभ- घाईगडबडीत निर्णय घेऊ नका, पैशांचे व्यवहार करताना विशेष काळजी घ्या. मिथुन - आज आपल्याला आरामाची नितांत गरज आहे. गुंतवणूक करणं टाळा. कामाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. कर्क - ताण असल्यानं आजारपण ओढवाल. मित्र-कुटुंबियांसोबत वेळ घावला तर रिलॅक्स वाटेल. खर्चावर वेळीच आवर घालणं गरजेचं आहे. सिंह - पैशांची चणचण भासेल. जवळच्या लोकांबरोबर वेळ घालवला नाही तर ते आपल्यावर रागावू शकतात. नव्या संधी मिळतील. कन्या - हट्टी स्वभाव तपासा, बोलताना समस्या उद्भवणार नाहीत याची काळजी घ्या. समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. हेही वाचा-तुमच्या या हेल्दी सवयी तुम्हाला बनवतायेत अनहेल्दी, शरीराला पोहोचवतात हानी तुळ - गडबडीनं निर्णय घेऊ नका. आपल्याला आयुष्यात दु: ख होऊ नये थोडे प्रयत्न करा. वैवाहिक जीवनात आजचा दिवस चांगला आहे. भावनांवर नियंत्रण ठेवले तर दिवस चांगला जाईल. वृश्चिक - व्यवसाय करण्यासाठी चांगला दिवस. आर्थिक लाभ होईल. आजचा दिवस आपल्यासाठी संमिश्र आहे. धनु - महत्त्वपूर्ण कामांचं नियोजन करा. गुंतवणूकीपूर्वी विचार करा. जोडीदाराकडे कमी लक्ष द्याल. मकर - आज प्रेम व्यक्त करू नका, धोक्याची घंटा असेल. आज केलेले प्रयत्न फलदायी ठरतील. प्रवासाचा फायदा आता नाही पण भविष्यात होईल. कुंभ - असे काही निर्णय घ्यावे लागतील जे भविष्याच्या दिशेनं वाटचाल करण्यास मदत करतील. योजनांमध्ये ऐनवेळी बदल होतील. वेळ वाया घालवण्याऐवजी सत्कारणी लावा. मीन- आपल्याकडून सल्ला घेतला जाईल. पैशांऐवजी आरोग्याला महत्त्व द्या. आरोग्याची काळजी घ्या. ताण घेऊ नका. आजचा दिवस संमिश्र असेल. हेही वाचा-कोणी छेड काढली तर थेट मारा ही मिरची बुलेट; कानातल्या झुमक्यातून सुटतील गोळ्या
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Horoscope

    पुढील बातम्या