राशीभविष्य : सिंह आणि मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे शुभ

राशीभविष्य : सिंह आणि मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे शुभ

प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होत असतो. कधी शुभ तर कधी अशुभ घटनांना सामोरं जावं लागतं.

  • Share this:

मुंबई, 27 मार्च : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होत असतो. कधी शुभ तर कधी अशुभ घटनांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे आजचा दिवस आपल्यासाठी कसा आहे आधीच माहीत असेल तर संकटांचा सामना करता येतो. त्यासाठी जाणून घ्या 27 फेब्रुवारीचं राशीभविष्य.

मेष - महत्त्वाकांक्षांच्या मागे धावाल, आज गुंतवणूक करणं टाळावं. प्रिय व्यक्तींच्या आठवणीत आजच्या आपला दिवस जाईल. आरामाचा आनंद घेऊ शकाल.

वृषभ- मानसिक ताण येईल अशा गोष्टींपासून दूर राहा. नवीन आर्थिक योजनांचा सामना करावा लागेल. निर्णय घेण्याआधी परिणामांचा विचार करा.

मिथुन - आरोग्याची विशेष काळजी घ्या. आर्थिक समस्या जाणवतील. आपल्या क्षेत्रात चांगलं काहीतरी करण्याची संधी आहे ती दवडू नका. खर्चावर नियंत्रण ठेवा.

कर्क - सगळ्या समस्यांवरचा उपाय हा हसणं आहे. त्यामुळे हसत राहा. दीर्घकाळासाठी केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल. प्रेमासाठी आजचा दिवस चांगला आहे.

सिंह - शुभ वार्ता मिळेल. जमीन, रिअल इस्टेट किंवा सांस्कृतिक प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. व्यवसाय आणि व्यवहारात सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

हे वाचा-VIDEO : ...म्हणून चीन Coronavirus ला हरवू शकला; लॉकडाउनमधलं वुहान कसं होतं पाहा

कन्या - रोगप्रतिकारकशक्ती कमी असणाऱ्यांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी. सकारात्मक विचारांच्या माध्यमातून या समस्येपासून मुक्त व्हा. रिअल इस्टेटमध्ये अतिरिक्त निधी गुंतविला जाऊ शकतो. आपला दृष्टीकोन मित्र आणि नातेवाईकांवर लादण्याचा प्रयत्न करू नका

तुळ - धीर धरा, कारण तुमची समजूतदारपणा व प्रयत्न तुम्हाला यशस्वी करतील. अतिरिक्त उत्पन्नासाठी तुमची सर्जनशील कल्पना घ्या, तुम्हाला मुलांसमवेत थोडा वेळ घालवावा लागेल.

वृश्चिक - आरोग्य सुधारण्यावर भर द्या. गुंतवणूक करण्याआधी योग्य माहिती घेणं गरजेचं आहे. बेफिकीर वृत्तीमुळे समस्यांचा सामना करावा लागेल.

धनु - खर्चावर नियंत्रण ठेवलं नाही तर समस्या उद्भवतील. कौटुंबिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो. आपल्या जोडीदारास समजून घेण्यात चूक होऊ शकते.

मकर - आत्मविश्वास वाढेल, प्रगतीसाठी आजचा दिवस चांगला आहे. चौकशी न करता गुंतवणूक करणं धोक्याचं ठरेल. प्रेमाच्या बाबतील दबाव आणला तर गोष्टी बिघडतील.

कुंभ- गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. कामाच्या ठिकाणी आपले पाय खेचण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रेमासाठी आजचा दिवस चांगला आहे. काही कारणांमुळे आज आपला मूड खराब होऊ शकतो.

मीन- वरिष्ठांच्या सहकार्यानं कामाला वेग मिळेल. जोडीदारासोबत संध्याकाळी वेळ घालवणं आनंद देणारं असेल. आज उधारीचे व्यवहार करू नका आणि तुम्हीही कुणाला उधार देऊ नका.

हे वाचा-कोरोनामुळे सेलिब्रेटी बसलेत घरी पण शेवंता मात्र रमली आहे या कामात, पाहा VIDEO

First published: March 27, 2020, 8:01 AM IST

ताज्या बातम्या