राशीभविष्य : कर्क आणि मकर राशीच्या लोकांना आज गुंतवणुकीतून मिळणार फायदा

राशीभविष्य : कर्क आणि मकर राशीच्या लोकांना आज गुंतवणुकीतून मिळणार फायदा

12 राशींसाठी कसा असेल 27 फेब्रुवारीचा दिवस वाचा सविस्तर

  • Share this:

मुंबई, 27 फेब्रुवारी : आपल्या राशीतील बदलत्या ग्रहांचा परिणाम आपल्या दिवसावर होतो. त्यामुळे प्रत्येक दिवस एकसारखा असेलच असं नाही. आपल्यासाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या 27 फेब्रुवारीचं राशीभविष्य.

मेष - कामावर लक्ष केंद्रीत करा. प्रिय व्यक्तींसोबत वेळ घालवाल. आज आपला उत्साह दुप्पट असेल.

वृषभ- कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल. काळजीपूर्वक गुंतवणूक करा. आवश्यक तिथे सल्ला घेणं फायद्याचं ठरेल.

मिथुन - मित्रांसोबत वेळ घालवाल. प्रवास करणे फायद्याचे पण महागडे ठरेल. कामाच्या ठिकाणी आळस जाणवेल.

कर्क - रिअल इस्टेटमध्ये केलेली गुंतवणूक फायदा मिळवून देईल. नव्या योजना आखाल. मूड बदलता राहिल्यानं काहीसा ताण जाणवेल.

सिंह - कामाचा ताण असेल. गडबडीत घेतलेला निर्णय मोठी समस्या उद्भवू शकतो. वैवाहिक जीवनात बरेच चढ उतार येणार आहेत.

हेही वाचा-तुमच्या या हेल्दी सवयी तुम्हाला बनवतायेत अनहेल्दी, शरीराला पोहोचवतात हानी

कन्या - खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. दुर्लक्ष केल्यास गंभीर आजार होऊ शकतात. आतापर्यंत आपल्याला न मिळालेला नफा अचानक मिळेल. वैयक्तिक आणि गोपनीय माहिती उघड करू नका

तुळ - अचानक उद्भवणारे खर्च आज आपलं बजेट कोलमडवू शकतात. अनेक योजनांमध्ये बदल करावे लागतील.

वृश्चिक - बेजबाबदार वृत्तीमुळे इतरांना दुखवाल. बोलण्याआधी दोनवेळा विचार करा. गुंतवणूकीसाठी आजचा दिवस चांगला आहे.

धनु - गुंतवणुकीशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घ्याल. पार्टनरसोबत पुरेसा वेळ न मिळाल्यानं चिडचिड होईल. योजनांमध्ये बदल होईल. आजचा दिवस आपल्यासाठी चांगला आहे.

मकर - मित्रांसोबत वेळ घालवा.गुंतवणूक केल्यास तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. कुठल्याही गोष्टीसाठी वेळ द्या. वेळ सर्वकाही व्यवस्थित करेल. बऱ्याच गोष्टी आज आपल्या धाडसाची परीक्षा घेतील.

कुंभ - खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा आहे.

मीन- नोकरी, व्यवसायात चांगलं यश मिळेल. प्रियजनांचे सहकार्य मिळेल. कुटुंबात शांतता राखण्यासाठी संवाद साधून काम करा. विसंवादानं तंटा वाढेल.

हेही वाचा-वजन कमी करायचंय; मग इतका भात, इतकी चपाती खा, हा Diet फॉलो करा

First Published: Feb 27, 2020 07:05 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading