राशीभविष्य : कन्या आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी आज नको ते धाडस करणं टाळा

राशीभविष्य : कन्या आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी आज नको ते धाडस करणं टाळा

कसा असेल (26 फेब्रुवारी 2020)आजचा आपला दिवस जाणून घ्या.

  • Share this:

मुंबई, 26 फेब्रुवारी : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील बदलत्या ग्रहांचा परिणाम आपल्या दिवसावर होतो. दिवसभरात मिळणाऱ्या शुभ वार्ता किंवा समस्या या बदलांमुळे होतात. त्यामुळे येणाऱ्या संकटाची पूर्वकल्पना असेल तर या समस्यांवर तोडगा काढता येतो. त्यामुळे आपल्यासाठी हा दिवस कसा असेल जाणून घ्या 26 फेब्रुवारीचं राशीभविष्य.

मेष - आपल्यात ऊर्जा असेल. अडकलेली काम मार्गी लागतील. आर्थिक परिस्थितीमुळे पैशांच्या कामांमध्ये अडथळा उद्भवू शकतो. मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवाल.

वृषभ- आपल्या हट्टी स्वभावाचा आपल्याला फटका बसू शकतो. आज पैसे खर्च होऊ शकतात. झालेल्या चुकांचा पश्चात्ताप करावा लागले. जोडीदाराचं प्रेम आणि विश्वास आज आपले नातेसंबंध अधिक दृढ करेल. मित्रांसोबत घालवलेला वेळ चांगला जाईल. आरोग्याची वेळीच काळजी घ्या.

मिथुन - बँकेचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आयुष्यात झालेल्या चुका विसरून पुन्हा नव्यानं आयुष्याला उभारी देण्यासाठी सज्ज व्हाल. सभोवताली घडणाऱ्या घटनांवर लक्ष ठेवा. कायदेशीर बाबींसाठी योग्य वकिलांचा सल्ला घ्या. पार्टनरची तब्येत बिघडेल.

कर्क - मित्र आणि सहकार्यांसोबतचा वेळ आनंदात जाईल. खर्चात अनियंत्रित वाढ होईल. त्यामुळे मानसिक शांतता भंग होईल. एखाद्यासोबत पटकन मैत्री टाळा. प्रेमात पडाल. जुन्या भेटीगाठींचा योग आहे.

सिंह - आजचा दिवस आपल्याला आनंद देणार आहे. आर्थिक फायदा होईल. वाद टाळण्यासाठी इतरांचे म्हणणे ऐका. प्रेमासाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार आणि व्यवसायिकांना कष्ट करावे लागतील.

हेही वाचा-जोडीदाराशी बोलताना भान राखा, रागातही असं काही बोलू नका

कन्या - तंदुरुस्त आणि निरोगी शरीरासाठी योग करा. आज उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील. प्रियजनांना निराश करू नका. नवीन योजना आणि व्यवसाय सुरू करण्याचं धाडस नको. प्रवास महाग पण फायद्याचा ठरेल.

तुळ - अस्वस्थ वाटेल. सकारात्मक विचार करा ज्यामुळे आपल्याला ताण येणार नाही. नियोजनाच्या कमतरतेमुळे आर्थिक चणचण भासेल. व्यवसायिकांनी सतर्क राहावं आज आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणं टाळा.

वृश्चिक - रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी आज विशेष काळजी घ्या. पैशांच्या कमतरतेमुळे आपली अनेक कामं अर्धवट राहू शकतात. नवीन योजना किंवा उद्योग सुरू करण्याचे धाडस करू नका. आजचा दिवस आपल्यासाठी शुभ नाही.

धनु - आज आपण पैसे अति खर्च कराल तर भविष्यात आर्थिक समस्या उद्भवतील. छोट्या कामांमधूनही उत्साह वाढेल. पार्टनरसोबत वेळ घालवा त्यातून आपल्याला आनंद आणि समाधान मिळेल. कठीण काळात ज्यांनी मदत केली त्यांच्याप्रती आभार मानण्याचा आजचा दिवस चांगला आहे.

मकर - गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्या. इतरांवर खर्च करणं बंद करा. त्यामुळे आपलं बजेट कोलमडू शकतं. जोडीदारासोबतच्या नात्यातील तणाव दूर करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार आणि व्यवसायिकांना आज चांगली बातमी मिळेल.

कुंभ - आज आपल्याला चांगली बातमी मिळू शकते. पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवा. कुटुंबातील सदस्यांच्या वागण्यामुळे आज आपल्याला ताण येईल. पार्टनरसोबत वेळ घालवण्यात अडथळे निर्माण होतील. आज आपलं ध्येय निश्चित करून त्या दिशेनं वाटचाल कराल. आजचा दिवस आपल्यासाठी चांगला आहे.

मीन - आत्मविश्वास कमी पडून देऊ नका. त्यामुळे तुमची समस्या अधिकच गुंतागुंतीची होईल. आपल्या प्रगतीमध्ये आज अडथळा निर्माण होईल. आत्मविश्वास पुन्हा मिळविण्यासाठी, संवाद साधा. डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून लोकांसोबत बोला आपल्या ओठांवर कायम स्मितहास्य असू द्या. भांडणाऐवजी शांतपणे आपलं मत मांडायला हवं. अचानक येणाऱ्या खर्चांमुळे आर्थिक ताण वाढेल.

हेही वाचा-रात्री चुकूनही पिऊ नका Green tea, आरोग्याला पोहोचेल हानी; जाणा योग्य वेळ कोणती?

First published: February 26, 2020, 7:11 AM IST

ताज्या बातम्या