मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

राशीभविष्य : सिंह आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी ठेवा आज खर्चावर नियंत्रण

राशीभविष्य : सिंह आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी ठेवा आज खर्चावर नियंत्रण

कोणाचे स्टार्स चमकणार आणि कोणाला करावा लागणार संकटांचा सामना जाणून घ्या राशीभविष्य.

कोणाचे स्टार्स चमकणार आणि कोणाला करावा लागणार संकटांचा सामना जाणून घ्या राशीभविष्य.

कोणाचे स्टार्स चमकणार आणि कोणाला करावा लागणार संकटांचा सामना जाणून घ्या राशीभविष्य.

  • Published by:  Kranti Kanetkar
मुंबई, 26 एप्रिल : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो. आज अक्षय तृतीया आहे. याच शुभ दिवशी कोणाचे स्टार्स चमकणार आणि कोणाला करावा लागणार संकटांचा सामना जाणून घ्या राशीभविष्य. मेष- आजचा दिवस आपल्यासाठी सकारात्मक आहे. गैरसमज दूर होतील आणि जोडीदारासोबत आजची संध्याकाळ चांगली जाईल. वृषभ- आरोग्याच्या समस्या दूर होतील. आर्थिक संकटातून मुक्तता होईल. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. मिथुन - कोणताही निर्णय घेताना दुसऱ्यांच्या भावानांचा विचार करा. निर्णय घेण्याआधी चांगल्या वाईट परिणामांचा विचार करा. जोडीदारासोबत वाद होतील. कर्क- वजन करण्यासाठी व्यायाम करा. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी चांगल्या आणि उणीवांचा काळजीपूर्वक विचार करा. नव विवाहितांसाठी आजचा दिवस खास आहे. सिंह - खर्चावर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस तुम्ही आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका. हे वाचा-महाराष्ट्रात कोणत्या राज्यात कोरोनामुळे किती लोकांचा मृत्यू, पाहा लेटेस्ट अपडेट कन्या- आज आपलं स्वप्न वास्तवात उतरण्याची शक्यता. प्रेम प्रकरणात आज आपण मौन बाळगणं महत्त्वाचं आहे. व्यावसायिकदृष्ट्या सकारात्मक दिवस असेल. तुळ - जास्त कामाचा ताण घेऊ नका. आपण आज प्रेमाच्या मनःस्थितीत असाल. कामाच्या ठिकाणी नव्या संधी मिळतील. व्यक्तीमत्त्व विकासासाठी आजचा दिवस द्या. वृश्चिक - तणावाकडे दुर्लक्ष करू नका.आजच्या प्रेमाच्या दृष्टीकोनातून आयुष्य खूप गुंतागुंतीचे होईल. धनु - अचनक नफा मिळण्याची शक्यता आहे. भावनांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. आज आपल्या मनानुसार गोष्टी होणार नाहीत पण तरीही धीर सोडू नका. मकर - आरोग्याच्या समस्यांमुळे आज अस्वस्थ व्हाल. खर्चात वाढ झाल्यानं बजेट कोलमडेल. जोडीदार आज आपल्यासाठी खास योजना आखू शकतो. कुंभ - आरोग्याच्या समस्या उद्भवतील. खर्चात वाढ होईल. प्रिय व्यक्तीचे गैरसमज दूर करा. आजचा दिवस आपल्यासाठी कठीण असू शकतो. मीन- घाईत निर्णय घेऊ नका. आजचा दिवस आपल्यासाठी चांगला असेल. कौटुंबिक वातावरण बिघडू शकतं. प्रिय व्यक्तीसोबत आज वेळ घालवा. हे वाचा-अक्षय तृतीयेला बदलणार बुध ग्रहाचं स्थान, जाणून घ्या 12 राशीवर काय होणार परिणाम
First published:

Tags: Astrology and horoscope, राशीभविष्य

पुढील बातम्या