मुंबई, 25 मार्च : गुढीपाडव्यानिमित्तानं आज नूतन वर्षाची सुरुवात होत आहे. हे वर्ष सर्वांना आनंदाचं जाणार आहे. रोजचा दिवस सारखा नसतो पण येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी दिवस कसा असेल हे आधीच जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या.
मेष - कुटुंबियांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरेल. आपण प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही. घरगुती सुविधांवर जास्त खर्च करु नका. प्रिय व्यक्तीच्या अनावश्यक भावनिक मागण्यांच्या समोर झुकू नका.
वृषभ- नकारात्मक वृत्तीमध्ये प्रगती करण्यात अडथळे निर्माण होतील. घरच्या दबावामुळे कौटुंबिक ताण येईल.
मिथुन - पेचात सापडलेल्या परिस्थितीतही घाबरून हार मानू नका. परिस्थिती आणि अनुभव आपल्याला सुखी राहण्याचं मूल्य सांगतं. नवीन योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. धीर सोडू नका.
कर्क - आरोग्याची चिंता करू नका. इतरांचे ऐकून आणि गुंतवणूक केली तर आर्थिक नुकसान जवळजवळ निश्चित आहे. कामाच्या दिशेने गोष्टी बर्याच होतील. पण संयमानं घेणं आवश्यक आहे.
सिंह - जास्त काम करणे टाळा, कारण यामुळे तुम्हाला फक्त तणाव व थकवा जाणवेल. आर्थिक प्रकल्पांमध्ये चांगली गुंतवणूक कराल. प्रेमाच्या बाबतीत आजच्या दिवस कठीण असेल.
कन्या - दिवस खूप फायदेशीर नाही. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. अनियमित वागण्यामुळे चिडचिडा होऊ शकतो.
तुळ - समस्यांचा सामना करावा लागेल. घरगुती सुविधांवर जास्त खर्च करु नका. भागीदारी प्रकल्प सकारात्मक परिणामापेक्षा समस्या जास्त उद्भवतील.
वृश्चिक - आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. गरजेपेक्षा जास्त खर्च टाळा. पार्टनरसोबत रोमँटिक होणं गरजेचं आहे. जोडीदार आपली खूप काळजी घेईल.
धनु - खर्चात अनपेक्षित वाढ होईल, त्यामुळे मानसिक ताण येण्याची शक्यता आहे. बऱ्याच काळापासून येत असलेल्या समस्येचं निराकरण करा.
मकर - अचानक अनपेक्षित खर्च आपल्यावर आर्थिक भार टाकू शकतात. प्रिय व्यक्तीची आठवण येईल. आपल्या क्षमता आणि कौशल्य आपल्याला वेगळी ओळख देईल.
कुंभ - बेजबाबदारपणामुळे वाद होऊ शकतात. जोडीदारासोबत बोलण टाळा. जुन्या गुंतवणुकीतून उत्पन्नात फायदा होईल. कोणत्याही अवास्तव मागण्यांना बळी पडल्यास मोठं नुकसान होईल.
मीन- मित्रांच्या मदतीनं संकटांवर मात कराल.अनावश्यक गोष्टींवर जास्त खर्च करून जोडीदाराचा राग ओढवून घ्याल. नातेवाईकांमुळे जोडीदारासोबत वाद होऊ शकतात.
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.