Home /News /lifestyle /

राशीभविष्य : मिथुन आणि वृश्चिक राशीच्या व्यक्तींचे पार्टनरसोबत होऊ शकतात वाद

राशीभविष्य : मिथुन आणि वृश्चिक राशीच्या व्यक्तींचे पार्टनरसोबत होऊ शकतात वाद

प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो.

    मुंबई, 24 एप्रिल : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो. त्यामुळे आज काय आनंदाची बातमी मिळणार आणि कोणत्या संकटांचा सामना करावा लागणार जाणून घ्या आजचं राशीभविष्य. मेष- खर्चात वाढ होईल, परंतु त्याच वेळी उत्पन्नातील वाढ समतोल राखेल. आज आपल्या प्रेमात बहर येईल. वृषभ- जोडीदारासोबत वेळ घालवा. आपल्याला प्रेमाला प्रेमानं उत्तर मिळेल. मिथुन - मानसिक शांतता हरवू शकते. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल. पार्टनर सोबत वाद होतील. नियोजन करून दिवस सुरू करा. कर्क- पैसे येतील कुटुंबातील सदस्यांना मदत करण्यासाठी वेळ वाया घालवा.खोटे बोलणे टाळा त्यामुळे प्रेमात दुरावा निर्माण होईल. सिंह - आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करु नका. ऑफिसमधील आपली चूक स्वीकारणे आपल्या बाजूने जाईल. मित्रांसोबत वेळ घालवणं फायद्याचं ठरेल. कन्या- दीर्घ मुदतीची गुंतवणूक टाळा. टीकेचा सामना करावा लागू शकतो. तुळ - निरोगी राहण्यासाठी खाण्याकडे लक्ष द्या. वाढते खर्च आपलं बजेट बिघडवू शकतात. प्रिय व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात अपयशी ठरेल. जोडीदारासोबत वाद होतील. वृश्चिक - रागामुळे वाद होतील.आपल्या प्रिय व्यक्तीस काहीही बोलू नका. धनु - आरोग्याकडे लक्ष द्या. आज आपल्याला प्रेमाचा अभाव जाणवू शकेल. व्यवसायासाठी आजचा दिवस चांगला आहे. मकर - एकाग्रता टिकवून ठेवण्यात अडचणी येतील. घाईत गुंतवणूक करू नका. भागीदारी व्यवसायत गुंतवणूक करू नका. योजना आखून काम करा. कुंभ - आरोग्याची काळजी घ्या. प्रियजनांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठराल. पार्टनरची तब्येत बिघडू शकते. कामाच्या ठिकाणी आनंदाची बातमी मिळेल. मीन- बळीचा बकरा होणार नाही याची काळजी घ्या. वाढते खर्चामुळे समस्या उद्भवतील. नवीन प्रकल्पात काम करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. प्रिय व्यक्तीला वेळ द्या.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Astrology and horoscope

    पुढील बातम्या