राशीभविष्य : धनु आणि कुंभ राशीच्या लोकांना आज प्रेमातून मिळेल आनंद

राशीभविष्य : धनु आणि कुंभ राशीच्या लोकांना आज प्रेमातून मिळेल आनंद

कसा असेल 12 राशींसाठी आजचा दिवस जाणून घ्या 22 मार्चचं राशीभविष्य

  • Share this:

मुंबई, 22 मार्च : प्रत्येक दिवस सारखा नसतो. कधी आनंद वार्ता घेऊन येतो तर कधी समस्यांचा डोंगर. येणाऱ्या समस्यांची चाहूल आधीच लागली तर त्या समस्या कशी सोडवायचा यावर विचार करता येतो. त्यामुळे दिवस कसा जाणार हे माहीत असेल तर आपल्याला पूर्वनियोजन करणं सोपं जातं. त्यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस.

मेष - कामाचा दबाव असल्याण ताण जाणवेल, प्रॉपर्टीत केलेली गुंतवणूक फायदा मिळवून देणारी आहे. गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न कराल. घाईगडबडीत निर्णय घेऊ नका.

वृषभ- नवीन करार आणि व्यवहार फायद्याचे ठरतील. गुंतवणूक करताना घाईघाईने निर्णय घेऊ नका. आपला बॉस आपल्याशी इतक्या उद्धटपणे का बोलतो हे आपल्याला शोधू शकाल.

मिथुन - आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. खर्चावर नियंत्रण ठेवलं नाही तर पश्चाताप करण्याची वेळ येईल. पार्टनरसोबत आज मतभेद होतील त्यातून वादाला कारण मिळेल. प्रेम प्रकरणांमध्ये गंभीरपणे विचार करून पावलं टाळा. जोडीदारासोबत वेळ घालवल्यास आनंद मिळेल.

कर्क- आर्थिक लाभ मिळेल. मित्रांपासून सावध राहा. कारण आज ते आपल्याला चुकीचा सल्ला देऊ शकतात. प्रेमाचा अभाव जाणवेल. प्रवासाच्या संधी गमावू नका, त्यातून फायदा मिळेल.

हे वाचा-'छातीवर दगड ठेवल्यासारखं वाटत होतं', कोरोनाग्रस्त तरुणीने शेअर केला अनुभव

सिंह - सर्जनशीलतेतून नवे मार्ग सापडतील. आर्थिक लाभ होईल मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा. अन्यथा हातात आलेला पैसा खर्च होऊन जाईल. कामात कठोर परिश्रम करत राहा. जोडीदाराची तब्येत खराब होऊ शकते.

कन्या- आताच्या सुखासाठी गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. पैसे मिळवण्यासाठी नवे पर्याय सापडतील. नव्या संधी मिळतील.आजचे काम तणावपूर्ण व कंटाळवाणे असेल पण मित्रांचा आधार तुम्हाला आनंदी व चैतन्यवान ठेवेल.

तुळ - आर्थिक लाभ मिळेल. आपण भविष्यासाठी पैसे जमा करावे, अन्यथा आपण अडचणीत येऊ शकता. आपल्या प्रेम प्रकरणात जास्त बोलू नका. वेगवेगळ्या विचारांमुळे आपण आणि आपल्या जोडीदारामध्ये वाद होऊ शकतो

वृश्चिक - खाण्याकडे लक्ष द्या. विनाकारण ताण घेतल्यानं मानसिक त्रास होऊ शकतो. योग्य वेळी आपली मदत एखाद्यास मोठ्या संकटातून वाचवू शकते. प्रेमाच्या बाबतीत दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका.

धनु - आपल्या मनातील द्वेषाची भावना घातक ठरू शकते. आर्थिक परिस्थिती सुधारेल पण खर्चही वाढेल. प्रेमाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असेल.

मकर - बर्‍याच काळापासून जाणवत असलेल्या थकवा आणि तणावातून आराम मिळेल. या समस्यांपासून कायमचा मुक्त होण्यासाठी जीवनशैलीत बदल करण्याची योग्य वेळ. आर्थिक सुधारण निश्चित आहे.

कुंभ - आपण भावनिकदृष्ट्या खूप संवेदनशील आहात, म्हणून आपल्याला ज्या गोष्टी दु:ख पोहोचवू शकतात असे प्रसंग टाळा. गुंतवणूक करण्याचा दिवस चांगला आहे. नवीन प्रेम संबंध बनण्याची शक्यता दृढ आहे. कामाच्या संदर्भात केलेला प्रवास फायदेशीर ठरेल.

मीन- मानसिक शक्ती प्राप्त करण्यासाठी, ध्यान आणि योग करा. खर्चावर नियंत्रण ठेवा हात सोडून खर्च करण्यास टाळा. आपल्या बेफिकीर वृत्तीमुळे घरात तुम्हाला टीकेचा सामना करावा लागेल. नवीन प्रकल्प आणि कामे राबविण्यासाठी एक चांगला दिवस आहे.

हे वाचा-फळं-भाज्या घेतानाही राहा सावध नाहीतर होऊ शकते Coronavirus ची लागण

First published: March 22, 2020, 8:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading