Home /News /lifestyle /

राशीभविष्य : तुळ आणि मिथुन राशीच्या लोकांनी ठेवायला हवं आज रागावर नियंत्रण

राशीभविष्य : तुळ आणि मिथुन राशीच्या लोकांनी ठेवायला हवं आज रागावर नियंत्रण

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? वाचा आजचं राशीभविष्य.

    मुंबई, 21 फेब्रुवारी: प्रत्येक दिवस सारखा नसतो. ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो. आज महाशिवरात्रही आहे. त्यामुळे आजचा दिवस 21 फेब्रुवारीचा दिवस आपल्यासाठी कसा आहे जाणून घ्या. मेष - मित्रांचं सहकार्य लाभेल. मित्रांसोबत वेळ घालवणं आनंददायी ठरेल. दीर्घकालीन समस्यांवर तोडगा काढणं गरजेचं आहे. सकारात्मक विचार करा आणि त्या दृष्टीनं पावलंही उचलायला सुरुवात करा यश आपलंच असेल. पार्टनरसोबत तणाव जाणवेल. वृषभ- खर्चात अनपेक्षित वाढ झाल्यानं तणाव जाणवेल. आव्हानांना समोरं जावं लागेल. दिवसभर थकवा जाणवेल. मिथुन - रागाच्या भरात समस्या उद्भवतील. त्यामुळे डोकं शांत ठेवा. जोडीदाराच्या वागण्यामुळे ताण निर्माण होईल. कर्क - तवणूक योजनांविषयी सखोलपणे जाणून घ्या. कोणतेही पाऊल उचल तज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. व्यावसायिकांसाठी चांगले दिवस आहेत. वैवाहिक जीवनात नैराश्य जाणवेल. सिंह - इतरांचे ऐकून आर्थिक गुंतवणूक केल्यास मोठं नुकसान होऊ शकतं. पार्टनरची फसवणूक होऊ शकते. जुन्या भेटीगाठी होतील. संयम आणि बुद्धीमत्तेचा वापर करून येणारी समस्या योग्य पद्धतीनं सोडवण्यात आपला कस लागेल. कन्या - विश्रांतीसाठी पुरेसा वेळ देणं हिताचं ठरेल. आपलं आर्थिक बजेट कोलमडेल. बर्‍याच योजना अपुऱ्या राहातील.प्रियकराची अनपेक्षित कृती आपल्या लग्नाबद्दलची धारणा बदलू शकते. मित्रांसोबत तुमचा चांगला काळ जाऊ शकतो. नव्या भेटीगाठी होतील. तुळ - कोणताही निर्णय घेताना स्पष्ट विचार करा. घाईनं किंवा रागात घेतलेल्या निर्णयामुळे नुकसान होऊ शकतं. केलेल्या योजनांमध्ये आयत्यावेळी बदल होतील. आरोग्याची काळजी घ्या. वृश्चिक - मानसिक ताण दूर करण्याचा प्रयत्न करा. करमणुकीसाठी वेळ आणि पैसा अति खर्च करू नका. प्रेमासाठी आजचा दिवस उत्तम आहे. प्रवासात वस्तुंची काळजी घ्या. धनु - नव्या संधी मिळतील. वाईट वेळेतही सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास फायदा होईल. बोलताना शब्द जपून वापरा. मकर - खाण्यावर लक्ष द्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. पार्टनरचं स्मितहास्य पाहून दिवसाची सुरुवात कराल. बऱ्याच काळापासून टाळत असलेल्या गोष्टी आज कराव्या लागतील. कुंभ - शासकीय योजनांमध्ये अडकण्यापासून टाळा. गुंतवणूकीत खूप सावधगिरी बाळगा. वादामुळे आज आपला दिवस खराब जाऊ शकतो. घरगुती कामात दिवस घालवणे खरोखर त्रासदायक आहे. दिवस चांगला जाण्यासाठी नियोजन करणं आवश्यक आहे. मीन - मागील दिवसाची मेहनत फळाला येईल. कामाकडे लक्ष द्या. मित्रांसोबत घालवलेला वेळ चांगला जाईल.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: राशीभविष्य

    पुढील बातम्या