राशीभविष्य : मेष आणि मीन राशीच्या व्यक्तींचं आज होऊ शकतं मोठं नुकसान

राशीभविष्य : मेष आणि मीन राशीच्या व्यक्तींचं आज होऊ शकतं मोठं नुकसान

कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या 20 जूनचं राशीभविष्य.

  • Share this:

मुंबई, 20 जून : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील बदलत्या ग्रहांच्या स्थितीचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो. त्यासाठीच जाणून घ्या कसा असेल आपला आजचा दिवस.

मेष- थकवा जाणवेल, छोट्या गोष्टींवरून राग येऊ देऊ नका. मित्र प्रिय व्यक्तीसोबत संवाद साधा.

वृषभ- खाण्याकडे लक्ष द्या. घरासाठी केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल. आजचा दिवस आपल्याला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

मिथुन - आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं. महत्त्वाच्या योजना राबवल्या जातील. चुकीच्या आणि अनावश्यक गोष्टींपासून दूर राहा.

कर्क- आज आपण जसे बोलाल तसे घडेल. ताण येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी आज अनेक गोष्टी आपल्या बाजूनं असतील.

सिंह - कामाचा ताण आणि कौटुंबिक दबााव यामुळे ताण येऊ शकतो. आज लोक आपली स्तुती करतील. जोडीदाराच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करू नका.

कन्या- आपल्यासाठी पुरेसा वेळ असेल. समस्या सोडवण्यावर भर द्या.

तुळ - मद्यपान आणि गाडीचा वेळ जास्त ठेवणं टाळा ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला नाही.

वृश्चिक - भुतकाळात गुरफटून राहू नका. चर्चेतून वाद सोडवण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनासाठी आजचा दिवस उत्तम आहे.

धनु - सहकारी आणि आपल्या मुलांना कामासाठी प्रोत्साहित करा.

मकर - आजचा दिवस आपल्या फायद्याचा आहे. आज आणि उद्या महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण करण्यावर भर द्या.

कुंभ - आपल्या प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवा. आज आपल्याला मेहनतीचं फळ मिळेल. जोडीदार आपल्याकडे विशेष लक्ष देईल.

मीन- आपला राग आपल्याला अडचणीत आणू शकतो. आज आपल्याला विश्रांतीची गरज आहे.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 20, 2020, 7:00 AM IST

ताज्या बातम्या