राशीभविष्य : मेष आणि कर्क राशीच्या लोकांनी निर्णय घेताना सावधगिरी बाळगा

राशीभविष्य : मेष आणि कर्क राशीच्या लोकांनी निर्णय घेताना सावधगिरी बाळगा

कसा असेल आजचा आपला दिवस जाणून घ्या 20 फेब्रुवारीचं राशीभविष्य.

  • Share this:

मुंबई, 20 फेब्रुवारी: प्रत्येक दिवस सारखा नसतो. राशीतील ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो. आजचा दिवस आपल्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

मेष - आरोग्याच्या समस्या उद्भवतील. आत्मविश्वास बाळगा. कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगणे हिताचे ठरेल. वैवाहिक जीवनात चढ-उतार जाणवतील.

वृषभ- लोकांकडून मिळणारा पाठिंबा आनंद आणि उत्साह वाढवणारा असेल. आज आपण इतरांना मदतीसाठी दिलेले पैसे पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. कामात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात पण धीर सोडू नका. नकारात्मक विचारांचा त्रास होईल.

मिथुन - आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. आर्थिक योजनांमध्ये अडकणे टाळा. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. मित्र-सहकाऱ्यांसोबत संध्याकाळ चांगली जाईल. जोडीदाराच्या तणावाचा दिवसावर परिणाम होईल.

कर्क - कोणाचीही चेष्टा करणं टाळा. कामाच्या ठिकाणी, महत्त्वाचे निर्णय घेताना सावधगिरी बाळगा. सुस्तपणा जाणवेल.

सिंह - कामाच्या ठिकाणच्या अतिरिक्त ताण आपलं आरोग्य बिघडण्यास कारणीभूत ठरेल. नव्या आर्थिक योजना कराल. आपली माहिती कोणालाही देऊ नका. कुणावरही पटकन विश्वास ठेवणं धोक्याचं ठरेल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.

हेही वाचा-लग्नाआधी मुलांनी 'या' गोष्टी शिकाव्यात, नंतरच डोक्याला मुंडावळ्या बांधाव्यात

कन्या - कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. पार्टनरसोबतचे काही किरकोळ वाद वाढल्यास वैवाहिक जीवनात ताण निर्माण होऊ शकतो. कोणतंही काम करण्याआधी ज्येष्ठांचा सल्ला आणि आशीर्वाद घ्या.

तुळ - द्वेषाची भावना अनेक समस्या उद्भवू शकते. गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होईल. कारकुनी कामात आपल्याकडून चुका होणार नाहीत याची काळजी घ्या. वैवाहिक जीवनात वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

वृश्चिक - पैसे कमवण्याचे मार्ग सापडतील. आजचा दिवस आपल्यासाठी चांगला आहे. निर्णय घेताना अहंकार बाजूला ठेवला तर यश आपलंच आहे. वैवाहिक जीवनात आज आनंदाचं वातावरण असेल.

धनु - कामाच्या ठिकाणी आज आपल्यावर समस्या उद्भवतील. टीकेला सामोरं जावं लागेल. मात्र धीर सोडू नका. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. कोणत्याही गोष्टीत केलेली घाईगडबड नुकसान करणारी असते. सावचित्तानं आणि शांत डोक्यानं परिस्थिती हाताळा.

मकर - इतरांवर दबाव आणू नका. भविष्यातील पैशांसाठी आजपासून योजना कराल. सहाकाऱ्यांच्या सहकार्यामुळे कामं वेगानं पूर्ण होतील. इच्छेनुसार आज गोष्टी झाल्या नाहीत तर निराश होऊ नका. वाईट दिवस फार काळ टिकून राहात नाहीत त्यामुळे आशा सोडू नका.

कुंभ - कुटुंबाच्या विरोधात जाऊन कोणताही निर्णय घेऊ नका. असे केल्यानं मोठ्या समस्यांचा सामना करावा लागेल. आर्थिक नियोजन आणि भविष्यातील योजना करण्याच्या दृष्टीनं पावलं उचला. घाईत केलेल्या गुंतवणुकीतून फसवणूक होऊ शकते.

मीन - स्वत:ला प्रोत्साहन द्या. वाईट परिस्थितीतही धीर न सोडता त्यातून चांगल्या गोष्टी शिकण्यावर भर द्या त्यामुळे आपलं व्यक्तीमत्त्व विकसित होईल. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. अति कामाचा ताण आणि दबाव यामुळे आज आपली चिडचिड होईल.

हेही वाचा-कमी बजेटमध्येही पूर्ण होईल फॉरेनला जायची इच्छा, World tour साठी 5 देश बेस्ट

First published: February 20, 2020, 7:02 AM IST

ताज्या बातम्या