राशीभविष्य : वृश्चिक आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना प्रेमासाठी आजचा दिवस आहे शुभ

राशीभविष्य : वृश्चिक आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना प्रेमासाठी आजचा दिवस आहे शुभ

प्रत्येक दिवस सारखा नसतो. राशीतील बदलत्या ग्रहांच्या स्थितीचा परिणाम होत असतो. त्यासाठी जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.

  • Share this:

मुंबई, 17 जून : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील बदलत्या ग्रहांच्या स्थितीचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो. त्यासाठीच जाणून घ्या कसा असेल आपला आजचा दिवस.

मेष- ताणाव येणार नाही याची काळजी घ्या. आजचा दिवस खूप फायदेशीर नाही. नातेवाईक, मित्र मैत्रिणींसोबत छान गप्पा रंगतील.

वृषभ- आज तुम्हाला बर्‍याच समस्या व मतभेदांना सामोरे जावे लागेल, यामुळे तुम्हाला त्रास होईल व अस्वस्थ वाटेल. विचापूर्वक केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल.

मिथुन - आज आपल्याला असुरक्षित वाटल्यानं मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो. गुंतवणूक करण्यापूर्वी दोनदा विचार करा.

कर्क- दीर्घ आजारापासून मुक्तता मिळेल. आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागेल.

सिंह - आपल्या ऊर्जेची पातळी वाढेल. अडकलेली कामं पूर्ण करण्याकडे लक्ष द्या.

हे वाचा-नदीतून वर आलं लुप्त झालेलं पुरातन मंदिर; महानदीत सापडला 500 वर्षांपूर्वीचा वारसा

कन्या- आज विश्रांती घेणं आणि आराम करणं महत्त्वाचं ठरेल. महत्त्वाच्या योजना आज राबवाल.

तुळ - खाण्यावर नियंत्रण ठेवा. दिवसाच्या उत्तरार्धाचा आर्थिक फायदा होईल. आपल्या सामाजिक जीवनात अडथळा आणू नका.

वृश्चिक - खर्चात अनपेक्षित वाढ झाल्याने तुमची मानसिक शांती भंग होईल. गरजूंना मदत कराल. प्रेमासाठी आजचा दिवस आनंददायी असेल.

धनु - प्रवास करू नका. गुंतवणुकीच्या फायदा आज होऊ शकतो. प्रिय व्यक्ती आपल्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेल.

मकर - अचानक झालेल्या खर्चामुळे आर्थिक भार वाढू शकतो. गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणे घडल्या नाहीत तरी धीर सोडू नका.

कुंभ - कामाचा अतिरिक्त ताण आल्यानं आरोग्य बिघडू शकतं. आपल्या जोडीदाराचे आज कौतुक कराल.

मीन- औषध घेण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. जोखीम भावनिकदृष्ट्या घेणे आपल्या बाजूने जाईल. स्पष्टपणे बोलण्याचा आज फायदा होईल. घाबरू नका फक्त संयम ठेवा.

हे वाचा-सुशांतच्या आत्महत्येला कोण जबाबदार? मानसोपचार तज्ज्ञांचं काय आहे मत

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 17, 2020, 7:06 AM IST

ताज्या बातम्या