राशीभविष्य : सिंह आणि कुंभ राशीच्या लोकांनी पार्टनरची घ्या काळजी

राशीभविष्य : सिंह आणि कुंभ राशीच्या लोकांनी पार्टनरची घ्या काळजी

  • Share this:

मुंबई, 15 मार्च : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो. येणाऱ्या समस्या आणि काय अडथळे आहेत याची पूर्वकल्पना असेल तर आपल्याला समस्येवर तोडगा काढणं अधिक सोपं होतं जाणून घ्या आपल्यासाठी कसा असेल 15 मार्चचा दिवस.

मेष - समस्यांचा सामना करावा लागेल. पैसे कमवण्याचे नवे स्त्रोत सापडतील. संध्याकाळ आज आपण आपल्या जोडीदाराबरोबर घालवू शकता.

वृषभ- उदार स्वभावाचा फायदा घेऊ देऊ नका. संवादातून बऱ्याच गोष्टींची उत्तरं मिळतील. पटकन मैत्री करणं घातक ठरू शकतं. कामात एकाग्रता निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही तर आपण आपले स्थान गमावू शकता.

मिथुन - गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवा. आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. प्रिय व्यक्तीच्या रागाची पर्वा न करता प्रेम करत राहा. खर्च होईल त्यामुळे खर्च कमी कसा करता येईल याकडे लक्ष द्या. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

कर्क - खराब मूडमुळे वैवाहिक जीवनात तणाव येऊ देऊ नका.आर्थिक लाभ मिळेल. प्रेम अनुभवता येईल. आपल्या आयुष्यातला हा कठीण टप्पा आहे. धीर न सोडता संयमानं काम करा.

सिंह - मित्रांमध्ये मतभेद होतील. बराच काळ गुंतवणूक केली तर तुम्हाला खूप फायदा मिळू शकेल. प्रतिष्ठा मिळेल, प्रसिद्धी मिळेल. जोडीदाराशी वादविवाद होऊ शकतात

कन्या - मानिक ताण आल्यानं थकवा जाणवू शकतो. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे दीर्घकालीन नफासाठी फायदेशीर ठरेल.

तुळ - आजचा दिवस आपल्यासाठी आनंददायी असेल. गुंतवणूक करणं टाळा. पार्टनरच्या हट्टाला बळी पडू नका. आपल्या योजनांमध्ये आज अनेक अडथळे येतील.

वृश्चिक - आपल्याला प्रोत्साहन मिळेल. संभ्रमाची स्थिती निर्माण होईल. भावनिक निर्णय घेताना बुद्धीचंही ऐका. खर्चावर आवर घाला. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात आजचा दिवस आपल्यासाठी चांगला आहे.

धनु - आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. आर्थिक स्थिती सुधारेल. घरगुती समस्यांचा आपल्या मनावर ताण येऊ शकतो. त्यामुळे चिडचिडा स्वभाव होण्याची शक्यता आहे. मन रमवण्यासाठी मनोरंजन, फिरणं किंवा वाचनाचा पर्याय अवलंबला तर दिवस चांगला जाईल.

मकर - आरोग्य चांगलं राहिलं तरी आजचा दिवस आपल्याला फायदा मिळवून देणार नाही. खर्चावर वेळीच नियंत्रण ठेवणं फायद्याचं ठरेल. प्रिय व्यक्तींना आपल्या मनातील भावना सांगा. कुटुंबियांसोबत जास्त वेळ घालवाल.

कुंभ - आपण जो विचार करता त्याचा आपल्या आयुष्यावर दीर्घ परिणाम होण्याची शक्यता आहे. लोकांना कर्ज देऊ नका. पार्टनरच्या तब्येतीची काळजी घ्या. प्रिय व्यक्तीची कमतरता जाणवेल. जोडीदारावर दबाव आणू नका. नकारात्मक विचारांमुळे समस्या उद्भवू शकतात.

मीन- कामाचा ताण जाणवेल. करमणुकीवर जास्त खर्च टाळा. नव्या योजना, प्रकल्प जास्त खर्चिक असतील. अपेक्षा पूर्ण न केल्याचा मोठा तोटा होईल.

First published: March 15, 2020, 12:19 PM IST

ताज्या बातम्या