तुळ आणि सिंह राशीच्या लोकांना मिळणार मोठी ऑफर, वाचा 15 फेब्रुवारीचं राशीभविष्य

तुळ आणि सिंह राशीच्या लोकांना मिळणार मोठी ऑफर, वाचा 15 फेब्रुवारीचं राशीभविष्य

कसा असेल आजचा आपला दिवस जाणून घ्या 15 फेब्रुवारीचं राशीभविष्य.

  • Share this:

मुंबई, 15 फेब्रुवारी: आपल्या राशीतील बदलत्या ग्रहांच्या स्थितीचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होत असतो. आजचा आपला दिवस कसा असेल, जर हे माहित असेल तर आपण सावधगिरी बाळगून आपल्य़ाला येणाऱ्या समस्यांचं निराकरण करू शकतो. जाणून घ्या 15 फेब्रुवारीचा दिवस आपल्यासाठी कसा असेल?

मेष - नियमित कामांमध्ये अडथळे जाणवतील. धीर सोडू नका. हातातील कामांवर पूर्ण लक्ष असूदे. शत्रूंपासून सावध राहा.

वृषभ - थकवा जाणवेल. आज कामाच्या ठिकाणी सतर्क राहाणं महत्त्वाचं आहे. व्यस्त दिवस असेल. सकारात्मक विचारानं कार्याची सुरुवात केली तर दिवस चांगला जाईल.

मिथुन - कठोर परिश्रमानंतरच यशाचा मार्ग दिसेल. निरनिराळ्या विचारांनी मन अस्वस्थ राहिल. उत्साहानं दिवसाची सुरुवात करा. नोकरीच्या ठिकाणी बदल होतील.

कर्क - भावनांवर नियंत्रण ठेवा. समस्यांचा सामना करावा लागेल. नवीन संधी मिळतील.टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करून आपले कार्य सुरु ठेवा.वाद घालण्यापेक्षा मौन केव्हाही फायद्याचे ठरेल.

सिंह - आज आपल्याला मोठी ऑफर मिळणार आहे. आर्थिक फायदा होईल. आजचा दिवस आपल्यासाठी आनंद देणारा आहे. खर्चावर नियंत्रण ठेवलं नाही तर समस्या उद्भवू शकतात. मौल्यवान वस्तू हरवण्याची भीती आहे.

कन्या - कोणताही निर्णय घेण्याआधी ज्येष्ठांचा सल्ला घ्या. प्रेमात पडाल. कामाच्या ठिकाणी नव्या जबाबदाऱ्या दिल्या जातील. पैशांशी संबंधित व्यवहार पूर्ण होतील.

तुळ - कामाच्या ठिकाणी अनेक नवे मार्ग सापडतील. आर्थिक वृद्धी होण्याच्या दिशेनं पावलं उचला. दिलेल्या जबाबदाऱ्या सहज पार पाडाल. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगा.

वृश्चिक - खर्चावर वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर आर्थिक समस्या उद्भवू शकतात. समस्या उद्भवल्या तर त्यावर शक्य तेवढा लवकर तोडगा काढा अन्य़था मोठं संकट येण्याची शक्यता आहे. तणाव जाणवेल.

धनु - आरोग्याच्या समस्या जाणवतील. कोणतेही कार्य करताना किंवा निर्णय घेताना सावधगिरी बाळगा. आर्थिक परिस्थिती सुधारेल. संवाद साधताना शब्द जपून वापरा. नियोजनात शेवटच्या क्षणी बदल होऊ शकतात.

मकर - आजचा दिवस आपल्यासाठी चांगला असेल. रिअल इस्टेट, प्रॉपर्टीच्या प्रकरणांमध्ये आपल्याला यश मिळेल. मित्र-आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतील. पैशांची चिंता मनात राहिल.

कुंभ - कौटुंबिक जबाबदाऱ्यांचं भान ठेवा. प्रेमात पडाल. महत्त्वपूर्ण योजना आज मार्गी लागतील. कुटुंबीयांसोबत वेळ चांगला जाईल. कोणतेही कार्य करताना धीर सोडू नका. प्रयत्न करत राहा.

मीन - करमणुकीच्या साधनांवर जास्त खर्च करू नका. जुन्या आठवणी आनंद देणाऱ्या असतील. भविष्यातील योजनांवर विचार करणं आवश्यक असल्यानं त्या दृष्टीनं पावलं उचला. आज महत्त्वाची कामं मार्गी लावा. प्रवास होईल.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हेही वाचा-VIDEO:आजीबाई रॉक्स! 72 वर्षांच्या आजींचा 'हाय रे तेरी फोटो' गाण्यावर तुफान डान्स

हेही वाचा-Board Exam : परीक्षेचं टेन्शन दूर करायचं असेल तर एकदा हे VIDEO पाहाच

हेही वाचा-दोन बछड्यांचं भांडण मिटवण्यासाठी धावून आली आई, पुढे काय झालं तुम्हीच पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 15, 2020 07:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading