मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

राशीभविष्य : मिथुन आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज घाईत निर्णय घेऊ नयेत

राशीभविष्य : मिथुन आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज घाईत निर्णय घेऊ नयेत

प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील बदलत्या ग्रहांच्या स्थितीचा परिणाम आपल्यावर होत असतो.

प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील बदलत्या ग्रहांच्या स्थितीचा परिणाम आपल्यावर होत असतो.

प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील बदलत्या ग्रहांच्या स्थितीचा परिणाम आपल्यावर होत असतो.

  • Published by:  Kranti Kanetkar
मुंबई, 14 : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील बदलत्या ग्रहांच्या स्थितीचा परिणाम आपल्यावर होत असतो. येणाऱ्या समस्या कोणत्या हे जर आधीच समजलं तर त्या टाळणं किंवा त्यांना सामोरं जाणं अधिक सोपं होतं. त्यामुळे जाणून घ्या कसा असेल आपला आजचा दिवस. मेष - आज आपल्या संयमाचा कस लागेल. दीर्घकालीन नफ्याच्या दृष्टीकोनातून गुंतवणूक करा. घरात अडचणींचा सामना करावा लागेल. जोडीदाराला पुरेसा वेळ न दिल्यानं वाद होतील. वृषभ- अतिरिक्त वेळ छंद जोपासण्यात घालवा. आर्थिक परिस्थिती सुधारेल. कामाच्या ठिकाणी आज आपला भ्रमनिरास होईल. कुटुंबाला जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करा. मिथुन- भविष्यासाठी बऱ्याच आर्थिक योजनांचं नियोजन करणं गरजेचं आहे अन्यथा आपल्याला समस्यांचा सामना करावा लागेल. कोणताही निर्णय घेण्याआधी परिणामांचा विचार करा. आज आपल्याला खूप थकवा जाणवेल. कर्क- आरोग्य चांगलं राहिल. अडथळे आले तरी हार मानू नका लढा आणि पुढे सरकत राहा. सिंह - कुटुंबात आपलं वर्चस्व कायम ठेवाल. जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. भागीदारी व्यवसाय फायदेशीर ठरेल.दीर्घकालीन गुंतवणूक करा. कन्या- निर्णय घेण्याआधी सर्व बाजूंचा विचार करा. मित्रांसोबत बोलून आनंद मिळेल. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुळ- हसत राहा त्यामुळे आपला दिवस चांगला जाईल. त्वरित आनंद साजरा करण्याच्या प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवा. वृश्चिक- वाढते खर्च आपल्यासाठी समस्या ठरतील. आई-वडिलांच्या आजाराकडे वेळीच लक्ष देणं हिताचं ठरेल. भागीदारी व्यवसायात पैसे गुंतवू नका. नवीन योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शुभ दिवस आहे. धनु- आरोग्य चांगलं राहिल. प्रिय व्यक्तीची आठवण येईल. भावनिकदृष्ट्या आपण कमजोर आहात त्यामुळे आपल्याला पटकन त्रास किंवा मानसिक ताण येऊ शकतो. संयम आणि शांत राहून अडचणींचा सामना करा. मकर- आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन यामुळे आजूबाजूचं वातावरण प्रसन्न होईल. गुंतवणूक करताना काळजी घ्या. जोडीदाराच्या वागणुकीमुळे आज आपल्याला त्रास होऊ शकतो. कुंभ- आरोग्याची काळजी घ्या. घाईत कोणतेही निर्णय घेऊ नका त्यामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. सल्ल्याशिवाय कोणतीही गुंतवणूक करू नका. समस्या सोडवण्यासाठी कौशल्याचा वापर अत्यावश्यक. जवळच्या लोकांसोबत गप्पा मारल्यानं आनंद मिळेल. मीन- अडचणींचा सामना करावा लागेल. आज खर्चावर नियंत्रण ठेवणं कठीण जाईल. प्रेमासाठी चांगला दिवस. जोडीदारासोबत घालवलेला वेळ चांगला जाईल. आपल्याला जे हवं ते मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. संपादन- क्रांती कानेटकर
First published:

Tags: Astrology and horoscope, राशीभविष्य

पुढील बातम्या