राशीभविष्य : कर्क आणि कुंभ राशीच्या लोकांना आज पार्टनरकडून मिळणार आनंदाची बातमी

राशीभविष्य : कर्क आणि कुंभ राशीच्या लोकांना आज पार्टनरकडून मिळणार आनंदाची बातमी

कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या 14 फेब्रुवारीचं राशीभविष्य.

  • Share this:

मुंबई, 14 फेब्रुवारी: प्रत्येक दिवस सारखा नसतो. याचं कारण म्हणजे आपल्या राशीतील ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा परिणाम. आपला दिवस कसा जाणार आहे हे जर आपल्याला माहीत असेल तर आपण येणाऱ्या समस्यांवर कशापद्धतीनं मात करता येईल यासाठी नियोजन करू शकतो. शक्य असेल तर समस्या कशी उद्भवणार नाही याची तरतूद करू शकतो. आज व्हॅलेंटाईन डे आहे. याच पार्श्वभूमीवर आजचा आपला दिवस करा असणार आहे जाणून घ्या 14 फेब्रुवारीचं राशीभविष्य.

मेष - पोटाचे आजार असणाऱ्यांनी आज विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. गुंतवणुकीतून लाभ मिळेल. नवीन संधी मिळतील. प्रेम संबंधांमध्ये पार्टनरच्या अनावश्यक मागण्यांना बळी पडू नका. घाईनं निर्णय घेतल्यानं समस्या उद्भवतील.

वृषभ - भूतकाळातील घटनांचा त्रास होईल. पार्टनरसोबत घालवलेला वेळ आनंद देणारा असेल. घरातील संवेदनशील समस्या सोडवण्यासाठी बुद्धीमत्तेचा कस लागेल. आजचा आपला दिवस चांगला आहे.

मिथुन - दीर्घ आजारापासून मुक्तता मिळेल. रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवल्यानं मोठा फायदा मिळेल. आपलं म्हणणं खरं करण्याच्या नादात जोडीदाराला दुखवू शकता. अफवांपासून दूर राहा.

कर्क - गाडी चालवताना काळजी घ्या. मित्रांसोबत घालवलेला वेळ आनंद देणारा आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल. प्रिय व्यक्तीकडून चांगली बातमी मिळेल. आज आपल्या संयमाची परीक्षा घेतली जाईल.

सिंह - सकारात्मक विचारांनी केलेलं काम फायदा मिळवून देईल. प्रवास होतील, त्यामुळे आपल्याला थकवा आणि ताण जाणवू शकतो. जोडीदारासोबत वाद होतील.

हेही वाचा-'व्हॅलेंटाइन डे' : रतन टाटांनी सांगितली त्यांची लव्ह स्टोरी, चीनमुळे तुटलं नातं

कन्या - अति काळजी करणं टाळा. प्रवासामुळे थकवा जाणवेल. आर्थिक फायदा होईल. जोडीदाराला मिळालेल्या यशाचा आज आनंद साजरा कराल. अडलेली काम मार्गी लागतील. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील.

तुळ - आपल्यावर अपेक्षांचं ओझं आहे. थोरामोठ्यांच्या आशीर्वादानं इच्छा पूर्ण होतील. रागावर नियंत्रण ठेवा. त्यामुळे आपण केलेल्या मेहनतीवर पाणी फिरेल असं काही करू नका.

वृश्चिक - मनोरंजनाच्या साधनांवर खर्च करू नका. आज प्रेमात पडाल, आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. जोडीदारावर प्रेम करण्यासाठी आज भरपूर वेळ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.

धनु - छंद जोपसण्यावर आजचा आपला अतिरिक्त वेळ द्यावा. त्यातून मिळणारा आनंद मोठा आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल. गुंतवणुकीतून मोठा फायदा होईल. पार्टनरची कमतरता जाणवेल.

मकर - आपल्या हट्टी स्वाभावाचा तोटा आपल्याला होईल. दीर्घ मुदतीची गुंतवणूक टाळा. मित्रांसोबत घालवलेला वेळ आज आनंद देणारा असेल. जोडीदारासोबत आज आनंद साजरा करा. नवीन भागीदारीमध्ये केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल.

कुंभ - जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. पार्टनरसोबत आजचा क्षण आनंदानं साजरा करा. त्यामुळे आपलं नातं अधिक घट्ट होण्यास मदत होईल. नवीन योजनांवर काम करा.

मीन - संघर्ष किंवा विरोध करणं टाळा. शब्द जपून वापरा. त्यामुळे कुणाचंही झालेलं नुकसान मोठं असेल. अविवाहित तरुणांना लग्नाचे प्रस्ताव येतील. नातेवाईक, मित्र, आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतील. योजनांमध्ये बदल होऊ शकतो. जोडीदारासोबत घालवलेला वेळ आनंद देणारा असेल.

हेही वाचा-या 7 रोमँटिक Kiss चा अर्थ तुम्हाला माहित आहे का? वाचा इथे

First published: February 14, 2020, 7:24 AM IST

ताज्या बातम्या