Home /News /lifestyle /

राशीभविष्य : सिंह आणि कन्या राशीच्या लोकांना पार्टनरचं मिळणार प्रेम

राशीभविष्य : सिंह आणि कन्या राशीच्या लोकांना पार्टनरचं मिळणार प्रेम

12 राशींसाठी कसा असेल आजचा आपला दिवस जाणून घ्या.

    मुंबई, 11 मार्च : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो. येणाऱ्या समस्या आणि काय अडथळे आहेत याची पूर्वकल्पना असेल तर आपल्याला समस्येवर तोडगा काढणं अधिक सोपं होतं जाणून घ्या 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस. मेष - आपल्या प्रिय व्यक्तींबद्दल चिंता वाटेल. नियमित कामं पूर्ण होण्यात अडचणी येतील. आपल्याला नवीन गोष्टी कळतील. महत्त्वाचे निर्णय समजतील. वृषभ- थकवा जाणवेल. कामाचा व्याप असल्यानं दिनचर्या व्यस्त राहिल. सकारात्मक विचार करा आणि धैर्याने कार्य करा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. रागाच्या भरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. मिथुन - स्वतःसाठी सकारात्मक विचार करा. आवडणाऱ्या व्यक्तीसोबत सर्वात जास्त वेळ घालवाल. आपल्या नोकरीच्या क्षेत्रात काही बदल होणार आहेत. कर्क - भावनांवर नियंत्रण ठेवा. थोडासा त्रासही सहन करावा लागेल. आज आपल्याला बर्‍याच संधी मिळतील. सिंह - आज आपल्याला मोठी ऑफर मिळणार आहे. आपल्या इच्छेनुसार कामं पार पडतील. महत्त्वाकांक्षेच्या दिशेनं वाटचाल कराल. जोडीदाराकडून खूप प्रेम मिळेल. हे वाचा-दैनंदिन वापरातील 'या' वस्तू तुम्ही बदलताय ना, नाहीतर आजारी पडाल कन्या - अनुभवांमधून आपण बरेच काही शिकू शकता. आयुष्यात प्रगती करण्याची संधी या अनुभवांमुळे सिद्ध होईल. शाशी संबंधित आपली कामं आज पूर्ण होतील. प्रेमात पडाल. तुळ - आजचा दिवस आपल्यासाठी चांगला आहे. आपल्या नोकरीच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी बरेच नवीन मार्ग आपल्यासमोर उघडणार आहेत. वृश्चिक - भागीदारी व्यवसायात आणि चतुर आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करु नका. आपली प्रिय व्यक्ती आपल्या वागण्यावरून आपल्यावर रागवेल. धनु - दीर्घ काळापासून सुरू असणारी समस्या आज सुटेल. रिअरल इस्टेटमध्ये केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल. आपलं लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेनं वेगान पावलं उचलण्याची गरज आहे. मकर - आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल.हत्त्वपूर्ण निर्णय घ्याल. रिअल इस्टेट आणि कोर्टाच्या खटल्यांमध्ये आज तुम्हाला यश मिळेल. कुंभ - आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आणि अपेक्षांनी परिपूर्ण आहे. कठीण समस्यांवर तोडगा काढाल. नवीन योजना आहेत त्या प्रत्यक्षात उतरतील. मीन- आजचा दिवस तुमच्यासाठी समस्या आणि समस्यांनी भरलेला आहे. नकारात्मक भावनांपासून दूर राहा. हे वाचा-काळजी वाढली! कोरोनाची लक्षणं दिसायला लागत आहेत 5 ते 14 दिवस
    Published by:Akshay Shitole
    First published:

    पुढील बातम्या