राशीभविष्य : वृषभ आणि धनु राशीच्या व्यक्तींना असेल आज कामाचा ताण

राशीभविष्य : वृषभ आणि धनु राशीच्या व्यक्तींना असेल आज कामाचा ताण

कोणाचे स्टार्स चमकणार आणि कोणाला करावा लागणार समस्यांचा सामना जाणून घ्या 11 जुलैचं राशीभविष्य.

  • Share this:

मुंबई, 11 जुलै: प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं जातं. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.

मेष- आर्थिक सुधारणा होतील. वेळ वाया घालवण्यापेक्षा काहीतरी नवीन शिका. प्रेमाचा आनंद घेऊ शकाल.

वृषभ- अचानक मिळालेल्या नफ्यानं आर्थिक बळकटी येईल. कामाचा तणाव आणि दबाव निर्माण केला जाईल. चांगला विचार करा.

मिथुन- नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जोडीदार आपल्याकडे दुर्लक्ष करू शकेल.

कर्क- आर्थिक परिस्थिती सुधारेल. कार चालवताना किंवा प्रवास करताना विशेष काळजी घ्या.

हे वाचा-चाकरमान्यांची कोकण बंदी टळली, यंदाचाही गणेशोत्सव गावीच मात्र...

सिंह- गुंतवणूक करण्यापूर्वी माहिती घ्या. समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्या. कोणत्याही गोष्टीवर अंधळेपणानं विश्वास ठेवू नका.

कन्या- ताण आणि चिंता आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडवू शकतात. हाताबाहेर खर्च करू नका. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवा.

तुळ- दिवस खूप फायदेशीर नाही. वैवाहिक जीवनात प्रेम आणि आनंद खूप महत्त्वाचा आहे.

वृश्चिक- अनुभवी लोकांकडून सल्ला घ्या. भागीदारी व्यवसायात फायदा मिळेल. जवळच्या नातेवाईक मित्रांची भेट घेण्याची शक्यता आहे.

हे वाचा-वॉरन बफेंना सोडलं मागे; मुकेश अंबानी जगातील श्रीमंतांच्या यादीत 7 व्या क्रमांकाव

धनु- खाण्याकडे लक्ष द्या. नियमित व्यायाम करा. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा.

मकर - प्रेमाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस चांगला आहे. आत्मविश्वासाचा फायदा घ्या. आपल्या प्रियकरासह पुरेसा वेळ घालवण्याची शक्यता आहे.

कुंभ- प्रेम प्रकरणा पुन्हा विचार करा. वेळ वाया घालवू नका. जोडीदारासोबत वाद होऊ शकतात.

मीन- आपल्या सकारात्मक दृष्टीकोन आणि आत्मविश्वासामुळे आपण आपल्या सभोवतालच्या लोकांना प्रभावित कराल.

Published by: Kranti Kanetkar
First published: July 11, 2020, 6:54 AM IST

ताज्या बातम्या