राशीभविष्य : मिथुन आणि तुळ राशीच्या लोकांना प्रेमात करावा लागेल अडचणींचा सामना

राशीभविष्य : मिथुन आणि तुळ राशीच्या लोकांना प्रेमात करावा लागेल अडचणींचा सामना

कोणाचे स्टार्स चमकणार आणि कोणाला करावा लागणार समस्यांचा सामना वाचा आजचं राशीभविष्य.

  • Share this:

मुंबई, 10 एप्रिल : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्याला दिवसात कोणती आव्हानं किंवा समस्या येणार याची कल्पना असेल तर त्या समस्यांवर नियंत्रण ठेवणं सोपं जातं त्यासाठी जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.

मेष - घाईत गुंतवणूक करू नका. करियरसाठी आतापासून नियोजन करणं हिताचं ठरेल.

वृषभ- स्पष्ट आणि निर्भिड वृत्तीमुळे आज आपण लोकांना दुखवाल. रिअरल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

मिथुन - आपल्या स्वार्थी वागणुकीमुळे आरोग्याला त्रास होऊ शकतो. प्रियकरापासून दूर राहणे आपल्यासाठी फार कठीण जाईल. करियरबाबत स्वत: निर्णय घ्या.

कर्क- आज आपला मूड खराब होऊ शकतो. त्वचेशी संबंधित आजार उद्भवतील. आज आर्थिक फायदा मिळेल.

सिंह - कामाचा दबाव आणि घरगुती मतभेद यामुळे ताण येऊ शकतो. जास्त खर्च आणि हुशार आर्थिक योजना टाळा.

हे वाचा-धारावीत कोरोनाचा कहर, आज सापडले आणखी 5 रुग्ण, एकूण संख्या 22 वर

कन्या- घरात अनेक बदल आपल्यासाठी अॅडजेस्ट करणं अवघड असलं तरी भावनिक असतील. प्रेमासाठी आजचा दिवस चांगला आहे.

तुळ - गुंतवणूकीत सावधगिरी बाळगा. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर काही मतभेद उद्भवू शकतात.

वृश्चिक - आपल्या सभोवतालचे लोक आपल्याला प्रोत्साहित करतील आणि त्यांचे कौतुक करतील. तुमचा खर्च वाढू शकतो.

धनु - हुशारीनं गुंतवणूक करा. संयमाने परिस्थितीचा सामना केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात.

मकर - मानसिक गोंधळ टाळण्याचा प्रयत्न करा.

कुंभ - प्रवास करताना काळजी घ्या. जास्त खर्च टाळा. आजचा दिवस आपल्यासाठी फायदेशीर नाही. पार्टनरच्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यानं दुखावला जाईल. दोघांनी एकमेकांसाठी वेळ काढणं हिताचं ठरेल.

मीन- अंदाजे किंवा ऐकीव माहितीवर पैसे गुंतवल्यास मोठं नुकसान होईल. वादग्रस्त विषयांवर बोलणं टाळा. संयम आणि धैर्य राखा त्यातूनच आपल्याला यशाचा मार्ग सापडेल.

हे वाचा-कोरोनाशी सामना करणाऱ्या 2 परिचारिकांनाच लागण, दादरमध्ये आढळले 3 रुग्ण

संपादन- क्रांती कानेटकर.

First published: April 10, 2020, 9:55 AM IST

ताज्या बातम्या